भारीच! अवघ्या 10 रुपयांची जुनी नोट तुम्हाला मिळवून देणार तब्बल 25 हजार, जाणून घ्या नेमकं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 19:12 IST2020-10-18T19:06:01+5:302020-10-18T19:12:08+5:30
10 Rupees Note : दहा रुपयांची जुनी नोट तब्बल 25 हजार मिळवून देऊ शकते. नेमकं कसं हे जाणून घेऊया.

भारीच! अवघ्या 10 रुपयांची जुनी नोट तुम्हाला मिळवून देणार तब्बल 25 हजार, जाणून घ्या नेमकं कसं?
नवी दिल्ली - जुनी नाणी, नोटा जपून ठेवायची अनेकांना आवड असते. विविध प्रकारचे कॉईन्स आणि नोटा जमवण्याचा अनेकांना छंद असतो. सध्या पैशाचे व्यवहार करतान 50, 100, 500, 2000 च्या नोटा या हमखास वापरल्या जातात. पण पाच आणि दहा रुपयांच्या जुन्या नोटा जास्त वापरल्या जात नाही. नव्या नोटाच सर्वत्र पाहायला मिळतात. मात्र आता अवघ्या 10 रुपयांची जुनी नोट तुम्हाला मोठी रक्कम मिळवून देणार आहे. दहा रुपयांची जुनी नोट तब्बल 25 हजार मिळवून देऊ शकते. नेमकं कसं हे जाणून घेऊया.
सध्या बाजारात दहा रुपयांच्या नव्या नोटा पाहायला मिळतात. मात्र काही वर्षांपूर्वी एका बाजूला अशोकस्तंभ असलेली नोट होती. तसेच तीन तोंडाचा सिंह असलेली नोटही होती. आता हीच नोट तुमचं नशीब चमकवू शकते. या दुर्मिळ नोटेवर 1943 मधील भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सी. डी. देशमुख यांची स्वाक्षरी आहे. दहा रुपयांच्या या नोटेवर एका बाजुला अशोकस्तंभ तर दुसऱ्या बाजुला नावेचे चित्र आहे. तसेच पाठच्या बाजूला इंग्रजीत 10 Rupees असं लिहिलं आहे.
कुठे आणि कशी विकणार नोट?
जर तुमच्याकडे दहा रुपयांची ही नोट असल्यास ती 25 हजार मिळवून देणार आहे. विशेष म्हणजे घरबसल्या ही नोट ऑनलाईन देखील विकता येणार आहे. इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्सवर या नोटा विकता येणार आहेत. या प्लॅटफॉर्मवर या नोटेला उत्तम किंमत मिळणार आहे. या वेबसाईट्स व्यतिरिक्त कॉईनबाजारवर देखील ही नोट विकता येणार आहे. तिथे जवळपास यासाठी 25 हजार मिळणार आहेत. मात्र यासाठी नोट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. यावरून तिची योग्य ती किंमत ठरवली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.