शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

बटन दाबल्यासरशी पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती, पश्चिम बंगालमधील स्टार्टअप कंपनीचे अनोखे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:34 IST

Research : पश्चिम बंगालमधील सोलेअर इनिशिएटिव्हज् या स्टार्टअप कंपनीने असे उपकरण बनवले आहे की, त्याचे एक बटन दाबल्यासरशी पाण्यातून ऑक्सिजन वायूची निर्मिती होते. हे उपकरण वेबेल-बीसीसीआय टेन इन्क्यूूबिनेशन सेंटर येथे बसविण्यात आले आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील सोलेअर इनिशिएटिव्हज् या स्टार्टअप कंपनीने असे उपकरण बनवले आहे की, त्याचे एक बटन दाबल्यासरशी पाण्यातून ऑक्सिजन वायूची निर्मिती होते. हे उपकरण वेबेल-बीसीसीआय टेन इन्क्यूूबिनेशन सेंटर येथे बसविण्यात आले आहे. ‘ओम रेडाॅक्स’ असे नाव दिलेल्या या उपकरणाच्या उपयुक्ततेची सोशल मीडियावरूनही चर्चा सुरू झाली आहे.

सोलेअर इनिशिएटिव्हज् या स्टार्टअप कंपनीचे सहसंस्थापक डॉ. सौम्यजित रॉय व त्यांच्या पत्नी डॉ. पेई लियांग यांनी दावा केला की, ओम रेडॉक्स उपकरण दुसरे-तिसरे काही नसून, ऑक्सिजन निर्माण करणारा एक सखोल शास्त्रीय शोध आहे. एखाद्या अन्य यंत्राद्वारे मिळणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा आमच्या उपकरणाद्वारे मिळणारा ऑक्सिजन साडेतीन पट शुद्ध आहे. 

डॉ. सौम्यजित रॉय हे कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, या उपकरणात पाण्यातून ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी प्रेशर स्विंग पद्धत वापरली जाते.देशाला स्वातंत्र्यप्राप्ती होऊन ७५ वर्षे झाली. त्यानिमित्त केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात ‘ओम रेडॉक्स’ची माहिती देण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाचे पेटंट घेण्यात आले आहे. या उपकरणाला जागतिक आरोग्य संघटना, युरोपीय समुदायाने मान्यता दिली आहे. पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या या नव्या उपकरणाचे जगभरात उत्पादन  व्हावे, असा स्टार्टअप कंपनीचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)

असे आहे उपकरण ओम रेडॉक्स उपकरण पांढऱ्या रंगाच्या पेटीसारखे असून, त्याचे वजन ८ किलो आहे. त्याचे बटन दाबताच उपकरणातील पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते. हे उपकरण विजेवर चालते. बॅटरीचा बॅकअप साडेतीन तासांचा आहे. 

आकार होईल लहानपाण्यातून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ओम रेडॉक्स उपकरणाचा आकार आणखी कमी करणे शक्य आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सोलेअर इनिशिएटिव्हज् या स्टार्टअप कंपनीने सांगितले.  

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनResearchसंशोधन