शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CBI, CID Difference: दया...! सीबीआय आणि सीआयडीमध्ये फरक काय? उद्देश एक पण कामे वेगवेगळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 20:24 IST

CBI, CID Difference: एक देश तर दुसरी राज्यांच्या पातळीवर तपास करतात. दोन्हींचा उद्देश जरी एकच असला तरी त्यांचे काम वेगवेगळे आहे. 

देशात सध्या सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा खूप चर्चेत आहेत. तर टीव्हीवर सीआयडी. या सीबीआय आणि सीआयडी या दोन्ही संस्था गुन्ह्यांची उकल करण्याचेच काम करतात परंतू दोन वेगवेगळ्या स्तरावर काम करतात. एक देश तर दुसरी राज्यांच्या पातळीवर तपास करतात. दोन्हींचा उद्देश जरी एकच असला तरी त्यांचे काम वेगवेगळे आहे. 

सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. या तपास संस्थेची स्थापना १९४१ मध्ये झाली होती. १९६३ मध्ये याचे नाव सीबीआय झाले. मुख्यालय दिल्लीत आहे. ही तपास संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणे हाताळते. 

सीबीआयचे सहा विभाग आहेत. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे विभाग, विशेष गुन्हे विभाग, धोरण आणि समन्वय विभाग, प्रशासन विभाग आणि केंद्रीय न्यायवैद्यक आणि विज्ञान प्रयोगशाळा विभाग यांचा समावेश आहे. भ्रष्टाचार आणि फसवणुकीशी संबंधित प्रकरणांचा तपास करणे हे सीबीआयचे मुख्य कार्य आहे. यासोबतच व्यावसायिक गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे हेही सीबीआयचे काम आहे.

सीआयडी म्हणजे काय?दिल्ली पोलीस आयोगाच्या शिफारशीवर 1902 मध्ये सीआयडीची स्थापना करण्यात आली. ही तपास संस्था राज्यातील गुन्ह्यांवर कारवाई करते. ही एजन्सी केवळ विशिष्ट राज्याशी संबंधित समस्या हाताळते. उच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार सीआयडी काम करते.सीबीआयप्रमाणे सीआयडीचेही सहा विभाग आहेत. यामध्ये फिंगर प्रिंट ब्युरो,  CB-CID, अंमली पदार्थ विरोधी ब्युरो, मानवी तस्करी विरोधी कक्ष, दहशतवाद विरोधी ब्युरो आणि श्वान पथक यांचा समावेश आहे. चोरी, दरोडा आणि बनावट नोटांच्या व्यापाराशी संबंधित माहिती गोळा करणे हे सीआयडीचे मुख्य कार्य आहे. यासोबतच विशेष प्रकरणांच्या तपासासाठी पथके तयार करणे हेही सीआयडीचे महत्त्वाचे काम आहे. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस