शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

सत्तापटाची पहिली बाजी गेहलोत यांनी जिंकली; सचिन पायलट गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 06:42 IST

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गेहलोत यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करणारा व सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे मनसुबे हाणून पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

जयपूर : उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काही आमदारांना फोडून अशोक गेहलोत यांचे काँग्रेस सरकार खाली खेचण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कथित ‘कारस्थाना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अस्थिरतेत पहिली बाजी मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकल्याचे चित्र सोमवारी दिसले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गेहलोत यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करणारा व सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे मनसुबे हाणून पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीला काँग्रेसच्या एकूण १०७ पैकी १०२ आमदार हजर होते. शिवाय सात अपक्ष आमदारांनीही गेहलोत यांना भेटून पाठिंबा जाहीर केला. परंतु नेमक्या याच दिवशी आयकर खात्याने अशोक गेहलोत यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्यांच्या घरांवर २० ठिकाणी छापे टाकले आहेत.पण नाराजी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्यासाठी काही समर्र्थक आमदारांना घेऊन दिल्लीला गेलेले पायलट बैठकीला गैरहजर होते. ही बैठक ठरल्या वेळेपेक्षा तीन तीस उशिराने सुरु झाली व येणारे आमदार माध्यमांच्या कॅमेऱ्यांपुढे बोटांनी ‘व्ही’या इंग्रजी अक्षराची विजयाची खूण करतच आत गेले.परंतु केवळ असा ठराव करून गेहलोत सरकार निर्धास्त राहू शकत नाही, हे लक्षात घेऊन बैठक संपताच काँग्रेसच्या आमदारांना जयपूर बाहेरच्या ‘फेअरमॉन्ट’ या आलिशान रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आमदारांना असे बंदोबस्तात ठेवण्याची ही दुसरी वेळ होती.गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचे सूचक विधान रविवारी करणाºया पायलट यांनी सोमवारी निदान दृश्य स्वरूपात तरी सरकार पाडण्याच्या दिशेने कोणतीही खेळी केली नाही. उलट त्यांची नाराजी अजूनही पूर्र्णपणे दूर झालेली नसली तरी ते काँग्रेस सोडणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या निकटवतीर्यांच्या हवाल्याने माध्यमांना पुरविली गेली. स्वत: पायलट नेमके कुठे आहेत, हेही दिवसभर गुलदस्त्यात ठेवले गेले. पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी आलेले पायलट त्यापैकी कोणाला भेटल्याचेही कळले नाही.काँग्रेसमधील जुन्या-नव्या नेत्यांच्या ढोबळ वर्गवारीमध्ये पायलट राहुल गांधी यांचे विश्वासू व निकटचे मानले जातात. पण पायलट यांच्या नावाने राजस्थानमध्ये बंडाचे निशाण फडकविल्याची आवई उठत असतानाही राहुल गांधी यांनी मात्र गेल्या दोन दिवसांत या सर्व घटनाक्रमावर कोणतेही बाष्य केलेले नाही. असे असले तरी, काँग्रेसमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार एकीकडे पायलट यांची समजूत घालण्याचे व दुसरीकडे आमदारांची मोट घट्ट बांधून ठेवण्याचे काम पडद्यामागून तेच करत आहेत. राहुल गांधी पायलट यांच्याशी स्वत: फोनवर बोलले व नंतर त्यांच्याच सांगण्यावरून अहमद पटेल, पी. चिदम्बरम व के. सी. वेणुगोपाळ या ज्येष्ठ नेत्यांनीही पायलट यांच्याशी संपर्क साधला, असेही सांगण्यात येते. पायलट यांची समजूत काढण्यात प्रियांका गांधीही सहभागी आहेत.सूत्रांनुसार राहुल गांधी पायलट यांच्याशी बोलल्यानंतरच अजय माखन, रणदीप सिंग सुरजेवाला व अविनाश पांडे या नेत्याना जयपूरला पाठविण्यात आले. ‘काँग्रेस पक्षात पूर्ण एकजूट आहे. भाजपाला उकळ््या फुटण्याचे काही कारण नाही’, असे विमानतळावर उतरताच माध्यमांना सांगून सुरजेवाला व इतर दोघे थेट मुख्यमंत्री गेहलोत यांच्या बंगल्याकडे रवाना झाले. गेहलोत सरकारला कोणताही धोका नाही, अशी खात्री पक्षाध़्यक्षा सोनिया गांधी यांनी देऊनच ते जयपूरला आले होते व दिल्लीत ठरल्याप्रमाणेच सोमवारी जयपूरमध्ये पावले टाकली गेली, असेही सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)पायलट यांचा नामोल्लेख नाहीजे कोणी काँग्रेसचे नेते अथवा आमदार सरकार अस्थिर करण्याचाप्रयत्न करत असतील किंवा यापुढे करतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आग्रह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील ठरावात करण्यात आला.पण त्यात पायलट यांचा मात्र नावाने उल्लेख टाळण्यात आला. याच दृष्टीने, ह्यपक्षातील मतभेद पक्षातच मिटविले जातील. सर्वांसाठी दारे खुली आहेत, असे सांगायला सूरजेवाला विसरले नाहीत.महाराष्ट्राबाबत काँग्रेसचेनेते झाले सावधराजस्थानातील राजकीय घडामोडींपासून धडा घेत महाराष्ट्रातील कॉँग्रेसच्या आमदारांना एकसंघ ठेवा, त्यांची कामे करा अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान