चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 17:03 IST2025-09-07T17:03:02+5:302025-09-07T17:03:39+5:30
गिरी गोवर्धन पूजेसाठी गावकरी एकत्र आले होते. या जखमींपैकी १२ जणांना छेंडीपाडा सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
ओडिशामध्ये एक भयानक घटना घडली आहे. देवगड जिल्ह्यातील रियामल ब्लॉकच्या राजचट गावात वीज कोसळून एका पुजेसाठी जमलेल्यांपैकी ५० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
गिरी गोवर्धन पूजेसाठी गावकरी एकत्र आले होते. या जखमींपैकी १२ जणांना छेंडीपाडा सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर असलेल्या तीन जणांवर कोसला सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. येथील चित्रकूट पर्वतावर शंभरहून लोक जमले होते. तेव्हा अचानक दुपारी ४ च्या सुमारात पाऊस आणि गडगडाट सुरु झाला. यावेळी त्यांच्यावर वीज कोसळली.
यामुळे अनेक लोक बेशुद्ध पडले. काही वेळाने ज्यांना शुद्ध आली ते कसेबसे त्या डोंगरावरून खाली आहे. परंतू १५ जण तिथेच बेशुद्ध पडलेले होते. गावात समजताच गावात राहिलेले लोक तिकडे धावले. त्यांनी जमखींना खाली आणले व सरकारी रुग्णालयांत दाखल केले.
आता अनेकांना उपचारानंतर सोडण्यात आले असून तिघे उपचार घेत आहेत.