घरगुती गॅस सिलिंडर सहा रुपयांनी महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 04:22 AM2019-05-02T04:22:15+5:302019-05-02T04:22:45+5:30

घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढविण्यात आली आहे; तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे.

Gas cylinders costlier by Rs 6 | घरगुती गॅस सिलिंडर सहा रुपयांनी महाग

घरगुती गॅस सिलिंडर सहा रुपयांनी महाग

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्यांना सरकारने जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढविण्यात आली आहे; तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे.

या किमती १ मेपासून लागू करण्यात आल्या आहेत. घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीनंतर दिल्लीतल्या रहिवाशांना सबसिडीच्या सिलिंडरसाठी ५०२ रुपये मोजावे लागणार आहेत; तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरसाठी ७३० हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. १ एप्रिललाही सिलिंडरच्या किमती वाढविण्यात आल्या होत्या. तेल कंपन्यांनी सबसिडी नसलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ५ रुपयांची वाढ केली होती; तर सबसिडीवाल्या सिलिंडरच्या किमतीत २५ पैशांची वाढ नोंदवण्यात आली होती. वर्षाला १४.२ किलोचे १२ सिलिंडर ग्राहकाला दिले जातात. त्यातील सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात.

Web Title: Gas cylinders costlier by Rs 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.