गंगा गोदावरीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:18+5:302015-07-16T15:56:18+5:30

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळयाच्या निमित्ताने खुले करण्यात आलेल्या रामकुंडावरील श्री गंगा गोदावरी माता मंदीरात भाविक दर्शनासाठी गर्दी करत असुन भाविकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

Ganga Godavari darshan of the devotees for the devotees | गंगा गोदावरीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

गंगा गोदावरीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

चवटी : सिंहस्थ कुंभमेळयाच्या निमित्ताने खुले करण्यात आलेल्या रामकुंडावरील श्री गंगा गोदावरी माता मंदीरात भाविक दर्शनासाठी गर्दी करत असुन भाविकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळयाच्या कालावधीत तसेच वर्षातून एकदा येणार्‍या माग शुद्ध प्रतिपदेला भाविकांना दर्शन व्हावे यासाठी श्री गंगा गोदावरी मंदीर उघडले जाते. माग शुद्ध प्रतिपदेला दहा दिवस तर सिंहस्थ कुंभमेळयाच्या ध्वजारोहण ते मुख्य तीन शाही पर्वणी तसेच वर्षभर सिंहस्थ पर्वण्यांच्या कालवधीत हे मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवले जाते. दर बारा वर्षांनी हे मंदीर उघडले जात असल्याने सध्या नाशिकसह परजिल्हयातील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असुन भाविकांच्या गर्दीमुळे परिसर गजबजून जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Ganga Godavari darshan of the devotees for the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.