शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

भाजप आमदारासह ७ जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 6:35 AM

उत्तर प्रदेशमधील घटना : आरोपींमध्ये आमदारांचे ५ पुत्र, भाचा

वाराणसी : उत्तर प्रदेशमधील भदोही विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी, त्यांचे पाच पुत्र व भाचा, अशा सात जणांवर सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला आहे. यासंदर्भात बलात्कारपीडित महिलेने पोलिसांकडे ९ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, त्रिपाठी यांचा भाचा गेल्या सहा वर्षांपासून माझ्यावर बलात्कार करीत आहे. त्याशिवाय आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी व इतरांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान माझ्यावर बलात्कार केल्याचा या महिलेचा दावा आहे. या बलात्कारपीडितेस पोलिसांची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. पोलिसांच्या तपास पथकाने प्राथमिक पुरावे गोळा केल्यानंतर आमदार त्रिपाठी, त्यांचे पाच पुत्र सचिन, चंद्रभूषण, दीपक, प्रकाश, नितेश व भाचा संदीप या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

या महिलेने म्हटले आहे की, तिच्या पतीचे २००७ साली निधन झाले असून, तिला मूलबाळ नाही. ती २०१४ साली मुंबईहून गावी परत येत असताना तिला संदीप ट्रेनमध्ये भेटला. त्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. संदीपने तिला लग्नाचे वचन देऊ न वाराणसी रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये ८ आॅगस्ट २०१६ रोजी बलात्कार केला. त्यानंतर भदोही, वाराणसी, मुंबईतील हॉटेलांमधील वास्तव्यात संदीपने या महिलेवर वारंवार बलात्कार केला. आमदार पुत्राकडून मारहाणवाराणसी : महसूल खात्यातील दलित अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील रोहनिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांचा पुत्र हजारी सिंह व त्यांच्या दहा समर्थकांविरुद्ध पोलिसांनी बुधवारी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या अधिकाºयाचे नाव राधेश्याम राम, असे आहे.चिन्मयानंदांच्या जामिनाला आव्हानच्बलात्कार प्रकरणातील आरोपी व भाजपचे माजी आमदार स्वामी चिन्मयानंद यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर केला होता. त्या निर्णयाला आव्हान देणाºया याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. ही याचिका बलात्कारपीडित महिलेने दाखल केली असून, तिची बाजू ज्येष्ठ वकील कॉलिन घोन्साल्विस यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. ही महिला स्वामी चिन्मयानंद यांच्या ट्रस्टकडून शहाजहानपूर येथे चालविण्यात येणाºया विधि महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी