शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कार व धर्मपरिवर्तन झाले नव्हते - मेरठमधील तरुणीचे घुमजाव

By admin | Updated: October 13, 2014 14:56 IST

मेरठमधील तरुणीवरील सामूहिक बलात्कार व धर्मांतर प्रकरणाने सोमवारी नवीन वळण घेतले आहे.

ऑनलाइन लोकमत

मेरठ, दि. १३ - मेरठमधील तरुणीवरील सामूहिक बलात्कार व जबरदस्तीने धर्मांतर या प्रकरणाने सोमवारी नवीन वळण घेतले आहे. 'राजकीय नेत्यांनी कुटुंबाला पैसे दिल्यानेच ही खोटी तक्रार दिली होती' असा जबाब पिडीत तरुणीने स्थानिक दंडाधिका-यांसमोर दिला असून कुटुंबीयांपासूनच जीवाला धोका आहे असे त्या तरुणीने म्हटले आहे.
ऑगस्टमध्ये मेरठमधील खरखौडा येथील एका तरुणीने पोलिसांकडे सनौल्लाह, नवाब आणि अन्य दोघा जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता.  बलात्कारानंतर नराधमांनी जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावला असे तिने तक्रारीत म्हटले होते. या घटनेनंतर देशभरात 'लव्ह जिहाद' हा नवीन वाद निर्माण झाला होता. मात्र घटनेच्या दोन महिन्यांनी या प्रकरणाने नवीन वळण घेतले. सोमवारी पिडीत तरुणीने घरातून पळ काढून पोलिस ठाणे गाठले व कुटुंबाविरोधातच तक्रार केली.  'मी स्वेच्छेनेच सनौल्लाहसोबत गेली होती, माझ्यासोबत सामूहिक बलात्कारही झाला नाही आणि माझे धर्मपरिवर्तनही झालेले नाही' असा जबाब या तरुणीने पोलिसांना दिला. 'माझ्या कुटुंबाला काही नेत्यांनी पैसे दिले होते व म्हणून सामूहिक बलात्कार व धर्मपरिवर्तन हे आरोप केले गेले असा दावाही तिने केला आहे. कुटुंबापासून माझ्या जीवाला धोका असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांप्रमाणेच तरुणीने दंडाधिका-यांसमोरही हाच जबाब दिला असून यानंतर तिची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. पैसे देणारे नेते कोण हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
दरम्यान, पिडीत मुलीचे कुटुंबीय याविषयी म्हणाले, काल दुपारी आरोपीच्या नातेवाईकांनी आम्हाला व तरुणीला धमकावले होते व आज सकाळी तीच लोक तरुणीला पोलिस ठाण्यातही घेऊन गेले होते. या नवीन खुलाश्यानंतर  उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरणही तापले आहे. भाजपनेच याप्रकरणाचा अपप्रचार केला असा दावा समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी दिला. तर भाजपनेही कायदा आपले काम करेल अशी सावध भूमिका घेतली.