माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 74वी जयंती, दिग्गजांनी वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 10:01 IST2018-08-20T09:05:08+5:302018-08-20T10:01:31+5:30

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74वी जयंती आहे.

Gandhi family and congress leaders tribute to former prime minster Rajiv Gandhi on his birth | माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 74वी जयंती, दिग्गजांनी वाहिली आदरांजली

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 74वी जयंती, दिग्गजांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74वी जयंती आहे. यानिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावेळी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत हे यावेळी उपस्थित होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टेलिकॉम, आयटी, पंचायत राजसहीत अन्य कित्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे.  1984 पासून ते 1989 पर्यंत राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे.

(राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडता येणार नाही; केंद्र सरकारची भूमिका)

राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईमध्ये झाला होता आणि 21 मे, 1991 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे 21 मे 1991 रोजी  महिला सुसाईड बॉम्बरद्वारे एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली होती.









 

Web Title: Gandhi family and congress leaders tribute to former prime minster Rajiv Gandhi on his birth