शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

बलात्कार प्रकरणातील आरोपी नित्यानंदने उघडली बँक, उद्या चलन लाँच करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 18:30 IST

दोन दिवसांपूर्वी नित्यानंदने एक व्हिडिओ जारी केला आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी त्याने 'रिझर्व्ह बँक ऑफ कैलास' या नावाने आपल्या बँकेची स्थापना केल्याची घोषणा केली आहे. 

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि फरार असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु स्वामी नित्यानंद हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नित्यानंदने उद्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपले चलन लाँच करणार आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने 'रिझर्व्ह बँक ऑफ कैलास' या नावाने आपल्या बँकेची स्थापना केल्याची घोषणा केली आहे. 

दोन दिवसांपूर्वी नित्यानंदने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने स्वत:ची बँक उघडण्याची घोषणा केली आहे. तसेच, गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण चलन जाहीर करणार असल्याचा दावाही त्याने या व्हिडिओमध्ये केला आहे. याशिवाय, येथील सर्व कामे कायद्यानुसारच करीत आहे. तसेच, आपल्या देशाचा पासपोर्टही बनविला असून तेथे आर्थिक व्यवस्थादेखील तयार केली जात आहे, असे नित्यानंदने म्हटले आहे.

नित्यानंद सध्या मेक्सिकोजवळील बेलाइज् येथे आहे, असे म्हटले जाते. इंटरपोलबरोबरच कर्नाटक आणि गुजरात पोलीसही नित्यानंदचा शोध घेत आहेत. दरम्यान, अमेरिकेतील इक्वोडोर देशाजवळील एका बेटाला नित्यानंदने स्वत:चा स्वतंत्र देश 'कैलास' म्हणून घोषित केल्याचे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जाहीर केले होते.

कोण आहे नित्यानंद?नित्यानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याचे खरं नाव राजशेखरन असे आहे. २००० साली त्याने बंगळूरु शहराजवळ स्वत:चे आश्रम सुरु केले. तेव्हापासूनच तो चर्चेत आला. स्वत:ला ईश्वराचा अवतार मानतो. २०१० साली त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. गुजरात पोलिसांनी नित्यानंदने भारतामधून पलायन केल्याची माहिती न्यायलयाला दिली होती. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ साली नित्यानंदला जामीन मंजूर झाला. याचाच फायदा घेत तो देशातून पळून गेला. 

आणखी बातम्या...

आता 1 रुपयात सोने खरेदी करू शकता, Amazon Pay चे नवे फीचर लाँच     

१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार    

आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका    

मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!    

जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी    

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार    

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँक