शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Fuel Hike : ...तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल, डिझेल विकेन- रामदेव बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 12:49 IST

Fuel Hike : इंधन दरवाढ-महागाईवरुन विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांना चहुबाजूंनी घेरले आहेच. मात्र आता मोदी सरकारला स्वकीयांकडूनही घरचा अहेर दिला जात आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरुन योगगुरु बाबा रामदेव यांनीही भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली - दररोज वाढणाऱ्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. महागाईवरुन विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांना चहुबाजूंनी घेरले आहेच. मात्र आता मोदी सरकारला स्वकीयांकडूनही घरचा अहेर दिला जात आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरुन योगगुरु बाबा रामदेव यांनीही भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. 

''सरकारनं परवानगी दिली तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल-डिझेल विकेन, करामध्ये सवलत देईन'', असे योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.  'लोकसभा निवडणूक 2019पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कपात करावी लागेल. नाही तर सरकारलाच ही महागाई खूप महागात पडेल',  भाजपा सरकारला सूचना देण्याचाही यावेळेस त्यांनी प्रयत्न केला. तर दुसरीकडे, मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करू शकते, ही बाबदेखील बाबा रामदेव यांनी यावेळेस मान्य केली. शिवाय, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या 28 टक्क्यांपेक्षा कमी कर प्रणाली अंतर्गत आणले गेले पाहिजे, असेही ते म्हणालेत.

(48 रुपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून सरकारला घरचा आहेर)

एनडीटीव्हीच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यादरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कपात केल्यास सरकारकडे पैसे कुठून येणार?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिलं की, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, अशा व्यक्तींवर आणखी कर लादावा. 

(मला तर पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं, महागाईची झळ बसतच नाही - रामदास आठवले)

महागाईवर मोदी सरकारवर निशाणा साधत असतानाच बाबा रामदेव यांनी पंतप्रधान मोदींच्या विकासकामांचंही कौतुक केले. ते म्हणाले की, ''पंतप्रधान मोदींवर टीका करणं हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे. मात्र मोदींनी चांगली कामंदेखील केली आहे. त्यांनी क्लिन इंडिया मिशन लाँच केले. त्यांच्या कार्यकाळात कोणताही मोठा घोटाळा झालेला नाही. दरम्यान, सध्या काही राजकीय मंडळी राफेल विमान डीलवरुन प्रश्न उपस्थित करत आहेत''. 

मोदी सरकारच्या प्रत्येक धोरणांचे, निर्णयांचे जोरदार समर्थन करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनीही इंधन दरवाढीच्या समस्येवरुन त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

दरम्यान, दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे.  देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. या समस्येवर ''कुठे आहेत अच्छे दिन?'', असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढBaba Ramdevरामदेव बाबाNarendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोल