दिल्लीत २ महिन्यांपर्यंत मोफत रेशन, रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ हजारांची मदत; केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 01:14 PM2021-05-04T13:14:52+5:302021-05-04T13:15:22+5:30

Delhi CM Arvind Kejriwal : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५००० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

Free rations for 2 months in Delhi, Rs 5,000 each for rickshaw-taxi drivers; Kejriwal's announcement | दिल्लीत २ महिन्यांपर्यंत मोफत रेशन, रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ हजारांची मदत; केजरीवालांची घोषणा

दिल्लीत २ महिन्यांपर्यंत मोफत रेशन, रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ हजारांची मदत; केजरीवालांची घोषणा

Next
ठळक मुद्देदिल्लीतील सुमारे ७२ लाख रेशनकार्डधारकांना दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाणार आहे.

 नवी दिल्ली : दिल्लीमध्ये (Delhi) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांसाठी दिल्ली सरकारने मंगळवारी दोन मोठे निर्णय घेतले. त्याअंतर्गत दिल्लीतील सुमारे ७२ लाख रेशनकार्डधारकांना दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५००० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. (All autorickshaw drivers and taxi drivers in Delhi will be given Rs 5000 each by Delhi govt so that they get a little help during this financial crisis: Delhi CM Arvind Kejriwal)

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
- दिल्लीमध्ये लॉकडाऊन लागू करणे अत्यंत महत्वाचे होते, जेणेकरून कोरोनाची प्रकरणे कमी होऊ शकेल. परंतु लॉकडाऊनमुळे गरिबांवर आर्थिक संकट ओढावते. विशेषत: रोजंदारीवर मजुरी करतात आणि जे रोज पैसे कमवतात व खातात, त्यांना घर चालविणेही अवघड होते.
- दिल्लीतील सुमारे ७२ लाख रेशनकार्डधारकांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाईल, परंतु याचा अर्थ असा नाही की कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन दोन महिने असेल. आर्थिक अडचणीत संघर्ष करणाऱ्या गरीब जनतेला मदत करण्यासाठी पाऊल उचलले आहे.


- याचबरोबर ऑटो आणि टॅक्सी चालकांना ५-५ हजार रुपयांची मदत केली जाईल.
- गेल्या लॉकडाऊनमध्ये दिल्ली सरकारने जवळपास १ लाख ५६ हजार चालकांची मदत केली होती.
- सध्याचा कोरोनाचा काळ कठीण असून आपण सर्वजण यातून जात आहोत.
- कोरोनची दुसरी लाट जास्त धोकादायक आहे.
- सर्व लोकांना विनंती आहे की, सध्या एकमेकांची मदत करा. सर्व लोक कोणत्याही पार्टीचे असो, सर्वांनी मिळून मदत करावी. यावेळी कोणीही राजकारण करू नये.
- आजारी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी, बेड न मिळाल्यास त्याची व्यवस्था करण्यास आणि ऑक्सिजन देण्यासाठी मदत करा.

Web Title: Free rations for 2 months in Delhi, Rs 5,000 each for rickshaw-taxi drivers; Kejriwal's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.