Free Petrol: खूशखबर! या पेट्रोल पंपांवर मिळणार ५० लिटर फ्री पेट्रोल, सुरू झालीय खास ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:20 IST2022-12-21T15:19:46+5:302022-12-21T15:20:25+5:30
Free Petrol: आपल्या देशात सरासरी १०० रुपये लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. मग ते फ्रीमध्ये कसे मिळेल हा प्रश्न तु्म्हाला पडला असेल. मात्र एक मार्ग आहे, ज्या माध्यमातून तुम्ही दरवर्षी ५० लिटर पेट्रोल मोफत मिळवू शकता.

Free Petrol: खूशखबर! या पेट्रोल पंपांवर मिळणार ५० लिटर फ्री पेट्रोल, सुरू झालीय खास ऑफर
कुठलीही गोष्ट ही फ्रीमध्ये मिळत नाही, हे तुम्ही ऐकलंच असेल. एखादी वस्तू मोफत मिळत असेल तर कुठून ना कुठून त्याची किंमत मोजावी लागते. पेट्रोलबाबत बोलायचं झाल्यास आपल्या देशात सरासरी १०० रुपये लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. मग ते फ्रीमध्ये कसे मिळेल हा प्रश्न तु्म्हाला पडला असेल. मात्र एक मार्ग आहे, ज्या माध्यमातून तुम्ही दरवर्षी ५० लिटर पेट्रोल मोफत मिळवू शकता. हे पेट्रोल तुम्हाला इंडियन ऑईलच्या काही पेट्रोल पंपावर मिळू शकते.
आता हे मोफत पेट्रोल कसे काय मिळेल, असा विचार तुम्ही करत असाल तर त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे आहे. एचडीएफसी बँक आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भागीदारी आहे. दोघांचंही एक क्रेडिट कार्ड आहे, ज्यावरून खर्च केल्यावर तुम्हाला पॉईंट्स मिळतील. दर महिन्याला मिळणाऱ्या कमाल फ्युएल पॉईंट्सच्या आधारावर कार्डधारक दरवर्षी ५० लिटरपर्यंत मोफत पेट्रोल मिळवू शकता.
आयओसीएल कार्डच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खर्चांमध्ये ५ टक्के बचत करू शकता. पहिल्या सहा महिन्यांमध्ये तुम्हाला कमाल २५० पर्यंत फ्युएल पॉईंट्स मिळवू शकता. त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांमध्ये तुम्हाला दरमहा कमाल १५० फ्युएल पॉईंट्स मिळवू शकता.
किराणा सामानाची खरेदी आणि बिल भरणा केल्यावर ५ टक्के फ्युएल पॉईंट्स मिळतील. दोन्हींमध्ये दर महा कमाल १००-१०० फ्युएल पॉईंट्स मिळू शकता. त्यासाठी किमान १५० रुपयांचा व्यवहार झाला पाहिजे.