शाळेत शिक्षक ओरडले म्हणून चार विद्यार्थीनींनी आत्महत्या करुन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 11:14 IST2017-11-25T11:11:16+5:302017-11-25T11:14:16+5:30

शाळेत शिक्षकांकडून या मुलींना जबरदस्त ओरडा पडला होता. शाळेत येताना सोबत पालकांना घेऊन यायला सांगितले होते.

Four students committed suicide due to suicide by school teacher | शाळेत शिक्षक ओरडले म्हणून चार विद्यार्थीनींनी आत्महत्या करुन संपवले जीवन

शाळेत शिक्षक ओरडले म्हणून चार विद्यार्थीनींनी आत्महत्या करुन संपवले जीवन

ठळक मुद्देशाळेत शिक्षकांकडून या मुलींना जबरदस्त ओरडा पडला होता.

वेल्लोर - शाळेत शिक्षक ओरडले म्हणून चार विद्यार्थीनींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी  ही धक्कादायक घटना घडली. या विद्यार्थीनी सरकारी उच्च माध्यमिक शाळेत शिकत होत्या. तीन विद्यार्थींनींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. 

गावातून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चौथ्या विद्यार्थीनीचा शोध सुरु होता. रेवती, संकार आणि दीपा अशी मृत विद्यार्थीनींची नाव आहेत. मनिषाचा मृतदेह सापडला नव्हता. वल्लोर जिल्ह्यातील आराकोनम येथील पानापक्कम येथील सरकारी शाळेत या मुली शिकत होत्या. 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. शाळेत शिक्षकांकडून या मुलींना जबरदस्त ओरडा पडला होता. शाळेत येताना सोबत पालकांना घेऊन यायला सांगितले होते. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांनी प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. 

Web Title: Four students committed suicide due to suicide by school teacher

टॅग्स :Deathमृत्यू