चार मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 01:42 IST2019-09-03T01:41:02+5:302019-09-03T01:42:39+5:30

शहरातील सिलामपूर परिसरात चार मजली जुनी इमारत कोसळली आहे

The four-story building collapsed in delhi silaampur, many fearing to be stuck | चार मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भिती 

चार मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भिती 

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील सिलामपूर परिसरात जुनी चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या मलब्याखाली इमारतीमधील अनेक रहिवासी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. इमारत दुर्घटनेचे वृत्त समजताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच, दुर्घटनेत इमारतीखाली दबललेल्यांना काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

सिलामपूर परिसरातील इमारत कोसळल्यानंतर स्थानिक रहिवाशी आणि पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आहे. अद्याप कितीजण अडकले, याची खात्रीशीर माहिती नाही. मात्र, बचाव पथकाकडून वेगात मदतकार्य सुरू आहे.

  
 

Web Title: The four-story building collapsed in delhi silaampur, many fearing to be stuck