कोरबा (छत्तीसगड) : देवगढ वन विभागातील अंगवाही (जिल्हा कोरबा) खेड्याजवळ रविवारी सायंकाळी जंगली अस्वलाने केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. मृतांत दोन महिलांचा समावेश आहे. जंगलातील काही वस्तू गोळा करून हे लोक परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी दुपारी हाती घेता आले. कारण अस्वल मृतांच्या जवळ बसलेले असल्यामुळे बराच वेळ काही करता आले नाही. जखमींमध्ये गंभीर दोघांसह तिघांनाही रुग्णालयात दाखल करून एकाला उपचारांनंतर घरी जाण्याची परवानगी दिली गेली.
अस्वलाच्या हल्ल्यात दोन महिलांसह चार जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 04:07 IST