Four people have died after a boiler exploded in an NGO's kitchen in Sugauli | मध्यान्ह भोजन बनवताना स्वयंपाकघरात बॉयलरचा स्फोट, चार जणांचा मृत्यू  
मध्यान्ह भोजन बनवताना स्वयंपाकघरात बॉयलरचा स्फोट, चार जणांचा मृत्यू  

मोतिहारी (बिहार) - बिहारमधील मोतिहारी येथे आज सकाळी एका एनजीओच्या स्वयंपाकघरात बॉयलर फुटून स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून, पाचपेक्षा जास्तजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोतिहारीमधील सुगौली येथे एका एनजीओच्या स्वयंपाकघरात ही दुर्घटना घडली. स्वयंपाकघरात शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करण्यात येत होते. त्याचदरम्यान बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Four people have died after a boiler exploded in an NGO's kitchen in Sugauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.