शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

हाहाकार! आसाममध्ये पावसाचं थैमान; 4 जणांचा मृत्यू, 53,000 लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 10:38 AM

Assam Rain : आसाममध्ये पाऊस आणि वीज पडून झालेल्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 53,000 लोकांना याचा फटका बसला आहे.

आसाममध्येपाऊस आणि वीज पडून झालेल्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 53,000 लोकांना याचा फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. दक्षिण सलमारा-मनकाचर जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रेमध्ये रविवारी रात्री बोट उलटल्याने एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आणि दोन जण बेपत्ता झाले, तर कछार, पश्चिम कार्बी आंगलाँग आणि उदलगुरी या भागात वादळामुळे काही लोकांना जीव गमवावा लागला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांना फोन करून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) चे सीईओ ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी सांगितलं की, वादळासह रविवारी संध्याकाळी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला ज्यामुळे अनेक झाडं आणि विजेचे खांब खाली पडले आणि घरांचं मोठं नुकसान झालं.

त्रिपाठी यांनी पीटीआयला सांगितलं की, “शिशुमारा घाटातून नेपुरेर अल्गा घाटाकडे जात असताना काल संध्याकाळी पाच वाजता नेपुरेर अल्गा गावात एक बोट बुडाली. स्थानिक लोकांनी एका मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून दोन जण बेपत्ता आहेत. समीन मंडल (4) असं मृताचं नाव असून कोबट अली मंडल (56) आणि इस्माईल अली (8) हे बेपत्ता आहेत.

एसडीआरएफच्या पथकाने आज सकाळी शोध मोहीम सुरू केली, त्रिपाठी म्हणाले की ASDMA पाळत ठेवण्यासाठी पायलटसह ड्रोन पाठवत आहे. बोटीत 15 प्रवासी होते, पण बाकीच्या लोकांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. याच दरम्यान, कछार येथे एका महिलेला वादळामुळे जीव गमवावा लागला. 

एएसडीएमएने सांगितलं की, पश्चिम कार्बी आंगलोंगमधील डोनका येथील पिंटू चौहान (17) आणि उदलगुरी येथील मजबत येथील रूपराम बासुमातारी (46) यांचा वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय वीज पडल्याने सहा जण जखमी झाले असून त्यांना सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ASDMA ने बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की वादळामुळे 22 जिल्ह्यांतील 919 गावांमधील सुमारे 53,000 लोकांना फटका बसला आहे आणि एकूण 14,633 घरांचं नुकसान झालं आहे.

टॅग्स :AssamआसामRainपाऊस