शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सुप्रीम कोर्टाच्या चार नव्या न्यायाधीशांचे शपथग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 2:39 AM

कोरम झाला पूर्ण; दोन नवे न्याय कक्ष स्थापन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नव्या न्यायाधीशांचा सोमवारी शपथग्रहण सोहळा झाला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ झाली असून, सर्व मंजूर पदे भरली आहेत.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्या. कृष्ण मुरारी, न्या. एस. रवींद्र भट्ट, न्या. व्ही. रामसुब्रमण्यन व न्या. ऋषिकेश रॉय यांना पदाची, तसेच गोपनीयतेची शपथ दिली. न्या. मुरारी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय, न्या. भट्ट राजस्थान उच्च न्यायालय, न्या. रामसुब्रमण्यन हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय, तर न्या. रॉय केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. केंद्र सरकारने या चौघांच्याही नियुक्तीला गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ३० आॅगस्टला या चौघांच्याही नावाची शिफारस केली होती. सरन्यायाधीशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्यायाधीशांची संख्या वाढविण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. काही दिवसांमध्ये केंद्र सरकारतर्फे नावांना मंजुरी देण्यात आली.५९ हजार खटले प्रलंबितकेंद्राच्या विधि मंत्रालयाने यावर्षी ११ जुलैला राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालयात ५९ हजार ३३१ खटले प्रलंबित आहेत. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने खटल्यांच्या सुनावणीसाठी दोन अतिरिक्त न्याय कक्ष तयार केले असल्याचे स्पष्ट केले.गेल्या आठवड्यात एक अधिसूचना काढून सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने दोन अतिरिक्त कक्ष सुरू करण्यात आल्याचे सांगितले होते. आता सर्वोच्च न्यायालयात एकूण १७ न्याय कक्ष झाले आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय