शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

चार ख्रिश्चन धर्मगुरूंवर बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 11:38 PM

मलानकारा आॅर्थोडोक्स सिरीयन चर्चच्या चार धर्मगुरुंविरुद्ध केरळ पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा सोमवारी दाखल केला. या चर्चच्या पाच धर्मगुरुंवर महिलेचे लैंगिक शोषण करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप होता.

तिरूवनंतपूरम : मलानकारा आॅर्थोडोक्स सिरीयन चर्चच्या चार धर्मगुरुंविरुद्ध केरळ पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा सोमवारी दाखल केला. या चर्चच्या पाच धर्मगुरुंवर महिलेचे लैंगिक शोषण करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप होता.पीडितेने गुन्हा शाखेच्या पोलिसांकडे येऊन आपले म्हणणे नोंदवल्यावर गुन्ह्याची नोंद केली गेली. या निवेदनात पीडितेने तिच्यावर बलात्कार झाल्याचे व ब्लॅकमेल केले गेल्याला दुजोरा दिला. माझ्या पत्नीवर चर्चच्या धर्मगुरुंनी बलात्कार केला असा आरोप करणारे पीडितेच्या पतीच्या चर्च अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणाची आॅडिओ क्लीप गेल्या आठवड्यात समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पथानामथित्ता जिल्ह्यातील या व्यक्तीने काही धर्मगुरू हे त्याच्या पत्नीच्या गुप्त कबुलीजबाबाच्या (कन्फेशन) आधारे तिला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप केला होता. तथापि, या प्रकरणी कोणतीही तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली नव्हती.राष्ट्रीय महिला आयोगानेदेखील पोलिस महासंचालक आणि राज्याच्या पोलिस प्रमुखांना या प्रकरणी तपास करून काय कारवाई केली याचा तपशील द्यावा, असे म्हटले होते. कोट्टायम येथील या चर्चने झालेल्या आरोपांच्या स्पष्ट आणि नि:पक्ष चौकशीचे आदेश आम्ही दिले असून दोषी आढळलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे म्हटले होते.आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही व निर्दोषीला शिक्षा केली जाणार नाही, असे चर्चचे निवेदनात म्हटले होते. ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल. कथित घटनेवरून अनुयायांच्या व सर्व सामान्यांच्या भावना आम्हाला समजतात. मात्र ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो, असेही चर्चने निवेदनात म्हटले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा