Leander Paes Joins BJP: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे माजी टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि भाजप नेते सुकांत मजूमदार यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतपणे भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना पेस यांनी भाजपाध्यक्ष नितिन नवीन यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती.
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का
लिएंडर पेस यापूर्वी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये होते. 2021 मध्ये गोव्यात ममता बॅनर्जी यांनी स्वतः त्यांना टीएमसीमध्ये प्रवेश दिला होता. त्या वेळी ममता बॅनर्जी यांनी पेस यांना “लहान भाऊ” म्हटले होते, तर पेस यांनी ममता बॅनर्जींना “खरी चॅम्पियन” म्हटले होते. मात्र टीएमसीमध्ये प्रवेशानंतर पेस यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळाली नाही. त्यामुळे ते हळूहळू पक्षापासून दूर गेले.
आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे टीएमसीसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. लिएंडर पेस यांचा जन्म कोलकाता येथे झाला असून त्यांचे कुटुंब कोलकाता आणि गोवा या दोन्ही राज्यांशी संबंधित आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे.
अनेक खेळाडू आधीच भाजपमध्ये
लिएंडर पेस हे भाजपमध्ये प्रवेश करणारे पहिले खेळाडू नाहीत. यापूर्वी अनेक खेळाडूंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी काहींनी निवडणुका लढवल्या, काही मंत्री झाले तर काही राज्यसभा खासदार झाले.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही प्रमुख खेळाडूंची नावे:
रविंद्र जडेजाराज्यवर्धन सिंह राठौरसाइना नेहवालबबीता फोगाटकीर्ति आजादचेतन चौहानकेदार जाधवएस. श्रीसंतकल्याण चौबेअरिंदम भट्टाचार्यविजेंद्र सिंह
राज्यवर्धन सिंह राठौर हे भाजपमध्ये प्रवेश करून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले सर्वात मोठे उदाहरण आहे.
भाजपला काय फायदा होऊ शकतो?
राजकीय विश्लेषकांच्या मते, लिएंडर पेस यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला विशेषतः पश्चिम बंगालमध्ये फायदा होऊ शकतो. कोलकाता आणि शहरी मतदारांवर प्रभाव असून, अपर मिडल क्लास मतदारांना आकर्षित करण्याची संधी भाजपकडे आहे. याशिवाय, युवा मतदार आणि क्रीडा प्रेमी मतदारांमध्ये सकारात्मक संदेश जाऊ शकतो. भाजप पेस यांना उमेदवारी देणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Leander Paes joined BJP, a blow to TMC before Bengal polls. Previously with TMC, Paes' Kolkata connection could benefit BJP, especially among urban voters. Several athletes are already in BJP.
Web Summary : लिएंडर पेस भाजपा में शामिल हुए, बंगाल चुनाव से पहले टीएमसी को झटका। पहले टीएमसी के साथ, पेस का कोलकाता कनेक्शन भाजपा को लाभ पहुंचा सकता है, खासकर शहरी मतदाताओं के बीच। कई एथलीट पहले से ही भाजपा में हैं।