शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
3
पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?
4
"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"
5
२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत
6
खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम
7
राज ठाकरेंना खरंच मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण नाही? मनसे नेत्याने केलं सूचक विधान
8
Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या
9
चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील
10
"लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला...", शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा
11
जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...
12
PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण
13
शेतकऱ्यांसाठी खास मोहीम, मोदी सरकार २० जूनपर्यंत देतंय 'ही' संधी
14
Pritam Munde : Video - "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात..."; रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट
15
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
16
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू
17
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"
18
PAK vs CAN : पाकिस्तानला पाऊस बुडवणार? शेजाऱ्यांची अस्तित्वाची लढाई, कॅनडाचे तगडे आव्हान
19
रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट
20
'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

राजीव गांधी दलालांसमोर लाचार होते- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 6:30 PM

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आदित्यनाथ यांची जोरदार टीका

लखनऊ: केंद्रात मोदी सरकार आल्यावर दलालांचं अस्तित्वच संपलंय, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. दलालांना सध्या दलालीच मिळत नाही. त्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत, असं आदित्यनाथ म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. माजी पंतप्रधान राजीव गांधी दलालांसमोर लाचार होते, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी शनिवारी हरदोई जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. माजी पंतप्रधान राजीव गांधींवर त्यांनी जोरदार टीका केली. 'तीस वर्षांपूर्वी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. विकासासाठी 100 रुपयांचा निधी पाठवल्यावर लोकांपर्यत फक्त 10 रुपये पोहोचतात, असं खुद्द तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यावेळचं सरकार लाचार होतं. मोदींच्या काळात संपूर्ण 100 रुपयांचा निधी जनतेपर्यंत पोहोचतो,' असं योगी आदित्यनाथ म्हणाले. देशात पहिल्यांदाच लोकांपर्यंत सर्वाधिक निधी पोहोचत असल्याचा दावादेखील योगींनी केला. 'विकासासाठी खासदार, आमदारांना जितका निधी मिळत नाही, तितका निधी आता सरपंचांना मिळत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचं जीवनमान उंचावेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधान ग्राम समाधान दिवसाचं आयोजन करण्याची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. यामुळे पंचायतीच्या माध्यमातून वादविवाद मिटवले जातील. यामध्ये महसूल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचादेखील सहभाग असेल. यामुळे गावातील लोकांना पोलीस ठाण्यात, न्यायालयात जावंच लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेस