Veerapandi A Raja: वडिलांच्या फोटोला हार घालत असतानाचा माजी आमदाराला हार्ट अॅटॅक, जन्मदिनीच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 22:44 IST2021-10-02T22:41:55+5:302021-10-02T22:44:54+5:30
Former DMK MLA Veerapandi A Raja: वीरापांडी ए. राजा हे त्यांचे वडील आणि माजी मंत्री वीरापांडी ए. अरुमुगम यांच्या फोटोला हार घातल असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

Veerapandi A Raja: वडिलांच्या फोटोला हार घालत असतानाचा माजी आमदाराला हार्ट अॅटॅक, जन्मदिनीच झाला मृत्यू
चेन्नई - द्रमुकचे माजी आमदार वीरापांडी ए. राजा यांचे शनिवारी त्यांच्या ५९ व्या जन्मदिनी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. (Former DMK MLA Veerapandi A Raja) वीरापांडी ए. राजा हे त्यांचे वडील आणि माजी मंत्री वीरापांडी ए. अरुमुगम यांच्या फोटोला हार घातल असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. (Former MLA Veerapandi A Raja dies of heart attack while wearing necklace on father's photo)
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार राजा त्यांच्या वडिलांच्या पोटोला हार घालत असतानाच बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजा २००६ मध्ये वीरापांडी येथून तामिळनाडूच्या विधानसभेत निवडून आले होते. तसेच सालेम जिल्ह्यामध्य पार्टी निवडणूक समितीचे ते सचिव होते. ते १९८२ पासून द्रमुकमध्ये सक्रिय होते. तसेच त्यांनी पक्षामध्ये विविध पदांवर काम पाहिले होते.
द्रमुकमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते एम. के. स्टॅलिन आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी माजी आमदार वीरापांडी ए. राजा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच स्टॅलिन यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.