अर्थक्रांतीचा दीपस्तंभ मावळला; आर्थिक चक्रीवादळाला थोपविणारे अर्थतज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:39 IST2024-12-27T12:39:16+5:302024-12-27T12:39:24+5:30

आर्थिक चक्रीवादळ घोंघावत असताना धीरोदात्तपणे तोंड देत त्यांनी भारताची नौका सहीसलामत किनाऱ्यावर आणली

Former Indian PM Manmohan Singh was known as a world renowned economist | अर्थक्रांतीचा दीपस्तंभ मावळला; आर्थिक चक्रीवादळाला थोपविणारे अर्थतज्ज्ञ

अर्थक्रांतीचा दीपस्तंभ मावळला; आर्थिक चक्रीवादळाला थोपविणारे अर्थतज्ज्ञ

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती. शांत स्वभाव, तटस्थ वृत्ती हा त्यांचा स्थायीभाव. आरबीआयचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशा चढत्या भाजणीच्या प्रदीर्घ कारकिर्दीत चेहऱ्यावरची असीम शांतता ढळल्याचे कधी, कुणीही पाहिले नाही. आर्थिक चक्रीवादळ घोंघावत असताना धीरोदात्तपणे तोंड देत त्यांनी भारताची नौका सहीसलामत किनाऱ्यावर आणली.

१९५४: पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली

१९५७ : कविजमधून इकॉनॉमिक ट्रायपो 

१९६२ : ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डी. फिल 

१९७१ : वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून भारत सरकारमध्ये रुजू 

१९७२ : अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती 

१९८०-८२ : नियोजन आयोगाचे सदस्य

१९८२-१९८५ : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर 

१९८५-८७: नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष 

१९८७-१०: जिनेव्हा येथे दक्षिण आयोगाचे सरचिटणीस 

१९९० : पतप्रधानांचे आधिक सल्लागार मार्च 

१९९१ : विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष 

१९९१ : आसाममधून राज्यसभेवर आणि २००१, २००७ आणि २०१३ मध्ये निवडून आले 

१९९१-९६: पीतही, नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये अर्थमंत्री 

१९९८-२००४ : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते 

२००४-२०१४: भारताचे पतप्रधान

अणुक्षेत्रात पुन्हा सन्मानाने प्रवेश

अमेरिका आणि भारत यांच्यात स्वाक्षरी केलेला १२३ करार भारत- अमेरिका अणु करार म्हणून ओळखला जातो. या करारावर १८ जुलै २००५ रोजी तत्कालीन भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू, बुश यांनी स्वाक्षरी केली. या करारामुळे भारताला आपल्याकडे असलेली अण्वस्त्रे बाळगून आंतरराष्ट्रीय स्तरावर अणुक्षेत्रात पुन्हा सन्मानाने प्रवेश करता आला.

युगाचा अस्त 

डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून घ्यावे असे दहा गुण 

आर्थिक दूरदृष्टी : डॉ. सिंग यांनी अर्थव्यवस्थेतील आव्हानांचा सामना करत, भारताला आर्थिक सुधारणांच्या मार्गावर नेले. 

प्रामाणिकता : प्रदीर्घ फाळ राजकारणात राहूनही त्यांची प्रतिमा कायम स्वच्छ राहिली. 

शांत स्वभाव : वादग्रस्त परिस्थितीतहीं संयम आणि शांतीने मार्ग काढण्याची कला त्यांच्यात होती. 

शिक्षणप्रेमी : अर्थशास्त्रातील प्रचंड ज्ञानामुळे जगभरात ओळख आणि शिक्षणावर प्रचंड विश्वास. 

कामगिरी केंद्रित : वादविवादांपेक्षा कामावर भर देऊन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कला. 

प्रभावी नेतृत्व : अविरत कष्ठ आणि आणि कौशल्याने देशाला जागतिक पातळीवर नेण्याचे नेतृत्वगुण

नम्रता आणि साधेपणा : मोठ्या पदावर असूनही त्यांची नम्रता आणि साधेपणा प्रेरणादायक राहिला

सहकार्याची वृत्ती : डॉ. सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत विविध राजकीय पक्षांशी सहकार्य करून धोरणात्मक निर्णय घेतले

अखंड अभ्यास : नेहमी स्वतःला अद्ययावत ठेवणारे आणि अभ्यासातूनच निर्णय पेणारे नेते

जागतिक दृष्टिकोन : जागतिक अर्थव्यवस्थेशी भारताला जोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधांवर भर.

जी कल्पना यशस्वी व्हायचीच असेल तिला पृथ्वीवरील कोणतीही शक्ती थोपवू शकत नाही. डॉ. मनमोहन सिंग
 

Web Title: Former Indian PM Manmohan Singh was known as a world renowned economist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.