शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

यूपीमध्ये काँग्रेसला मोठा झटका, राजेश मिश्रा भाजपामध्ये दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 16:19 IST

Rajesh Kumar Mishra : भदोही लोकसभा मतदारसंघातून राजेश मिश्रा निवडणूक लढवू शकतात, असे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली :  देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांकडून पक्षांतर सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार राजेश मिश्रा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजेश मिश्रा यांना भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद आणि अरुण सिंह यांनी पार्टीचे सदस्यत्व दिले. 

भदोही लोकसभा मतदारसंघातून राजेश मिश्रा निवडणूक लढवू शकतात, असे म्हटले जात आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राजेश मिश्रा म्हणाले की, यावेळी वाराणसी लोकसभा जागेवर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पोलिंग एजंट मिळणार नाही, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीचे खासदार आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे, असे राजेश मिश्रा यांनी सांगितले.

याचबरोबर, नरेंद्र मोदी यांनी जगभर देशाचा गौरव केला आहे, असे म्हणत राजेश मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले, तसेच. राजेश मिश्रा म्हणाले की, उत्तर प्रदेशातकाँग्रेसने समाजवादी पार्टीसमोर शरणागती पत्करली आहे. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारही नाहीत. तसेच, राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही प्रश्न उपस्थित करत जातीचा मुद्दा उपस्थित करणे योग्य नसल्याचे राजेश मिश्रा यांनी सांगितले.

दरम्यान, राजेश मिश्रा 2004 ते 2009 दरम्यान वाराणसीचे खासदार होते. अजय राय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच राजेश मिश्रा यांनी पक्षावर प्रश्न उपस्थित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजेश मिश्रा हे काँग्रेसकडून भदोही मतदारसंघातून तिकीट मागत होते, पण समाजवादी पार्टीसोबत युती केल्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेश