शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचं कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 08:54 IST

जगन्नाथ पहाडिया यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीयमंत्री बनून अनेक वर्षे देशाची सेवा केली. देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी ते एक होते, असेही मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय

ठळक मुद्देजगन्नाथ पहाडिया यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री, हरयाणाचे राज्यपाल आणि केंद्रीयमंत्री बनून अनेक वर्षे देशाची सेवा केली

जयपूर - राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे बुधवारी निधन झाले, ते 93 वर्षांचे होते. सध्या त्यांच्या पत्नीवरही दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काँग्रेसचे दिग्गज आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची देशभरात ओळख होती. पहाडिया यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे. कोविड 19 च्या संक्रमणामुळे पहाडिया आपल्यातून निघून गेले. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. 

जगन्नाथ पहाडिया यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री, हरयाणाचे राज्यपाल आणि केंद्रीयमंत्री बनून अनेक वर्षे देशाची सेवा केली. देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी ते एक होते, असेही मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. पहाडिया यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचविण्याची ताकद मिळो, असे म्हणत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 

एक दिवसाचा दुखवटा

जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, तिरंगा ध्वज अर्ध्यावर फडकणार आहे. सरकारी कार्यालयातही दुखवटा पाळण्यात येईल. तसेच, मंत्रिमंडळा बैठकीत पहाडिया यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्रीDeathमृत्यूRajasthanराजस्थान