माजी मुख्यमंत्री बघेल यांचा पुत्र चैतन्यच्या संपत्तीवर टाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 05:43 IST2025-11-14T05:41:12+5:302025-11-14T05:43:22+5:30
Chaitanya Baghel News: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांची ६१.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने हंगामी टाच आणली आहे. दारू घोटाळ्याशी निगडीत ही कारवाई आहे.

माजी मुख्यमंत्री बघेल यांचा पुत्र चैतन्यच्या संपत्तीवर टाच
नवी दिल्ली - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांची ६१.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने हंगामी टाच आणली आहे. दारू घोटाळ्याशी निगडीत ही कारवाई आहे. बघेल यांचे ५९.९६ कोटींचे ३६४ निवासी प्लॉट आणि शेतजमीन तसेच बँक खात्यातील रकम व मुदतठेवी यांसह १.२४ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली.
छत्तीसगडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी कारवाई
दारू घोटाळ्यात गुंतलेल्यांना २५०० कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने केला आहे. दारू सिंडिकेटवर नियंत्रण ठेवण्याचे काम चैतन्य बघेल करत होता. अवैध पैसा चैतन्य याने आपल्या रिअल इस्टेट व्यवसायासाठी वापरला. त्याला ईडीने १८ जुलैला अटक केली. याआधी या प्रकरणात अनिल तुतेजा (माजी आयएएस), अरविंद सिंग, त्रिलोक सिंग ढिल्लन, अन्वर ढेबर, अरुण पती त्रिपाठी आणि कावसी लखमा (माजी महसूल मंत्री) यांना ईडीने अटक केली होती.