प्रकृती बिघडल्याने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह रुग्णालयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 10:20 IST2019-07-24T10:20:03+5:302019-07-24T10:20:22+5:30

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Former Chhattisgarh Chief Minister Raman Singh hospitalized | प्रकृती बिघडल्याने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह रुग्णालयात 

प्रकृती बिघडल्याने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह रुग्णालयात 

गुरुग्राम (हरियाणा) - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रमण सिंह  यांनी काल रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
रमण सिंह  गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. दोन दिवसांपूर्वीच 22 जुलै रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.  रमण सिंह हे डिसेंबर 2003 पासून डिसेंबर 2018 पर्यंत छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदावर होते.

Web Title: Former Chhattisgarh Chief Minister Raman Singh hospitalized