Video - अरेरे! भाजपाचे नेते फटाके वाजवायला गेले अन् तोंडावरच आपटले, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 16:33 IST2022-10-20T16:32:22+5:302022-10-20T16:33:25+5:30
भाजपा नेते विनय सिंह एका मैदानात फटाका पेटवत होते, त्याचवेळी ते तोंडावर पडले.

Video - अरेरे! भाजपाचे नेते फटाके वाजवायला गेले अन् तोंडावरच आपटले, नेमकं काय घडलं?
फटाके फोडणं एका भाजपा नेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. फटाका पेटवताना नेते तोंडावरच आपटल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत आहे. भाजपा नेते विनय सिंह एका मैदानात फटाका पेटवत होते, त्याचवेळी ते तोंडावर पडले. व्हिडिओमध्ये विनय सिंह यांनी फटाका पेटवला. त्यावेळी ते घाबरतही होते. सध्या या घटनेची तुफान चर्चा रंगली आहे.
फटाक्याला आग लागली तसे ते जोरजोरात पळू लागले. पळता पळता मागे वळून पाहत असतानाच त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर पडले. तोंडावर आपटले. जेव्हा विनय सिंह खाली पडले तेव्हाच फटाकाही फुटला. मिळालेल्या माहितीनुसार, दिघवारातील मलखाचकच्या जसा सिंह क्रिडा मैदानातील ही घटना आहे.
बिहार के सोनपुर से पूर्व विधायक विनय सिंह पटाखा जलाकर भागते हुए मैदान में औंधे मुंह गिर पड़े,वीडियो सोशल मीडिया पर वायरल.
— Aanchal Dubey (@AanchalDubey21) October 18, 2022
#ViralVideo#Biharpic.twitter.com/ppSL09EksQ
भाजपाचे वरिष्ठ नेता विनय सिंह एका फुटबॉल मॅचचं उद्घाटन करायला गेले होते. मॅच सुरू होण्याआधी त्यांना फटका पेटवण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी ही घटना घडली. ते जमिनीवर पडताच उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना वर उचललं.ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.