चमत्कार! मृत्यूनंतर अर्ध्या तासाने जिवंत झाले भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 12:42 PM2023-08-07T12:42:01+5:302023-08-07T12:47:15+5:30

Mahesh Baghel : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

former bjp district president mahesh baghel resurrected after being declared dead | चमत्कार! मृत्यूनंतर अर्ध्या तासाने जिवंत झाले भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष; नेमकं काय घडलं?

चमत्कार! मृत्यूनंतर अर्ध्या तासाने जिवंत झाले भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष; नेमकं काय घडलं?

googlenewsNext

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना घरी आणलं, मात्र अर्ध्या तासानंतर त्यांच्या शरीरात हालचाल जाणवू लागल्याने सर्वांनाच धक्का बसला. नातेवाईकांनी बघेल यांना पुन्हा रुग्णालयात नेले. आता त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती समोर आली आहे. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर महेश बघेल यांना सराय ख्वाजा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं. बघेल यांच्या निधनानंतर नातेवाईक शोक करत होते, तेवढ्यात महेश बघेल यांनी डोळे उघडले आणि शरीराची हालचाल केली. हे पाहून रडणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना न्यू आग्रा येथील रुग्णालयात नेले, तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

महेश बघेल यांचे लहान भाऊ लखन सिंह बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्या मोठ्या भावावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा रक्तदाब 114/70 आहे. उपचाराचा सकारात्मक परिणाम त्यांच्यावर फायदा होत असून ते आता बरे असल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून चमत्कार असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: former bjp district president mahesh baghel resurrected after being declared dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा