धक्कादायक! 99 वर्षीय वृद्धाने केला 10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 10:18 IST2018-07-09T10:17:19+5:302018-07-09T10:18:53+5:30

चेन्नईमध्ये एका 99 वर्षीय वृद्धाने 10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

former 99 years old headmaster arrested for sexual assault to 10 year girl | धक्कादायक! 99 वर्षीय वृद्धाने केला 10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

धक्कादायक! 99 वर्षीय वृद्धाने केला 10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

चेन्नई : सुप्रीम कोर्टात आज निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होणार असतानाच चेन्नईतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेन्नईमध्ये एका 99 वर्षीय वृद्धाने 10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी एका सरकारी शाळेचा माजी मुख्याध्यापक आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला सन्नीरकुप्पम परिसरातील एका घरातून अटक करण्यात आली आहे. परशुराम असं या आरोपीचं नाव असून त्याची एकूण पाच घरं आहेत. दोन वर्षापूर्वी त्यापैकी एक घर हे पीडित मुलीच्या आईवडीलांना राहण्यासाठी भाड्याने देण्यात आले होते. शुक्रवारी मुलीच्या पोटात अचानक खूप दूखू लागल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी डॉक्टरकडे नेले. उपचारादरम्यान, चिमुरडीचे शारिरीक शोषण झाल्याची बाब समोर आली. 

मुलीच्या आईवडिलांनी याबाबत मुलीकडे चौकशी केली असता तिने वृद्धाने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक आपभीती सांगितली. त्यानंतर लगेचच चिमुरडीच्या पालकांनी पोलिसात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानूसार आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी परशुरामनेही त्याचा गुन्हा कबूल केला आहे.
 

Web Title: former 99 years old headmaster arrested for sexual assault to 10 year girl