पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 07:24 IST2025-06-08T07:23:46+5:302025-06-08T07:24:31+5:30
India Post: आपत्कालीन मदत असो, की ऑनलाइन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्या यासाठी टपाल विभागाने आता दहा अंकी डिजिपीन प्रणाली सुरू केली आहे. यामुळे एखाद्या ठिकाणाची अचूक ओळख करता येणार आहे.

पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
मुंबई - आपत्कालीन मदत असो, की ऑनलाइन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्या यासाठी टपाल विभागाने आता दहा अंकी डिजिपीन प्रणाली सुरू केली आहे. यामुळे एखाद्या ठिकाणाची अचूक ओळख करता येणार आहे. देशातील प्रत्येक ठिकाणाचा या १० अंकी पिनमुळे आता अचूक पत्ता मिळेल. यूझरला अधिकृत संकेतस्थळावरून हा क्रमांक मिळवता येणार आहे.
नेमके काय होणार फायदे?
रुग्णवाहिका, अग्निशमन दलास पत्ता अचूक शोधता येईल. लॉजिस्टिक्स, कुरिअर डिलिव्हरी, कॅब बुकसाठी वापर. ग्रामीण आणि दुर्गम भागातील वितरण सेवा आणखी सुलभ होईल.
डिजिपीनमुळे चुका कमी होऊन कार्यक्षमता आणि सेवांचा वेग वाढण्यात मदत होईल. पोस्टल डिलिव्हरी अधिक अचूक, जलद आणि कार्यक्षम करण्यात फायदा होईल.
कसा आणि कुठे जनरेट करावा?
नकाशावरील आपले अचूक स्थान सांगणारा डिजिटल पिन स्वत: जनरेट करता येईल.
https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home या संकेतस्थळाला भेट द्या.
येथे तुमच्या डिव्हाइसचे लोकेशन ॲक्सेस देऊन १० अंकी डिजिपीन तयार होईल.
पिन कोड, डिजिपीनमधील फरक काय?
सहा अंकी पारंपरिक पिन कोड एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी वापरला जातो. डिजिपीन मात्र, विशिष्ट घर किंवा स्थळाच्या नेमक्या ठिकाणासाठी वापरला जाणार आहे.
या प्रणालीमुळे टपाल विभाग गाव, जंगल किंवा समुद्रकिनाऱ्यापर्यंतही अचूक ठिकाणी पोहोचू शकतो. ही संकल्पना संपूर्ण देशाच्या क्षेत्राला
४ बाय ४ मीटर आकारात विभागते.