शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुराणाचे पालन करा मुफ्ती अमजदअली काझी : शहरात रमजान ईद उत्साहात

By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST

सोलापूर : कुराण म्हणजे ईश्वराचा शब्द आहे़ यातून जगाला शांततेचा संदेश दिला गेला आहे़ आयुष्य चांगले व्यतीत करायचे असेल तर कुराणाचे पालन करा, असे आवाहन शहर काझी मुफ्ती अमजदअली काझी यांनी केले़

सोलापूर : कुराण म्हणजे ईश्वराचा शब्द आहे़ यातून जगाला शांततेचा संदेश दिला गेला आहे़ आयुष्य चांगले व्यतीत करायचे असेल तर कुराणाचे पालन करा, असे आवाहन शहर काझी मुफ्ती अमजदअली काझी यांनी केले़
रमजान ईदनिमित्त होटगी रोडवरील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली़ याप्रसंगी त्यांनी तमाम जनतेला मार्गदर्शन करीत असताना वरील आवाहन केले़
सकाळी ९ वाजता होटगी रोडवरील ईदगाह मैदान मुस्लीम बांधवांनी फुलून गेले होते़ प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या कोपर्‍याला थाटलेल्या मंडपातून शहर काझी आणि काही बांधवांना गुलाबाची फुले देऊन त्यांचे स्वागत केले गेले़ यावेळी पालकांच्या सोबत लहान मुलांनीही नमाज अदा करण्यासाठी मैदानावर हजेरी लावली होती़ जवळपास १५ मिनिटे नमाज अदा करण्यात आली़ त्यानंतर शहर काझी यांनी तमाम जनतेला आपल्या प्रवचनातून मार्गदर्शन केले़
वाहतूक वळवली
ईदगाह मैदान हे मुख्य रस्त्यावर असल्याने महावीर चौक, हॉटेल किनारा येथून आत होणारी वाहतूक थांबवून पर्यायी मार्ग काढून दिला होता़ याप्रसंगी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता़ मुख्य रस्ता आणि ईदगाह मैदानावर केवळ प्रार्थना करण्यासाठी आलेल्या बांधवांची गर्दी होती़
आबालवृद्धांचीही हजेरी
नमाज अदा करण्यासाठी या मैदानावर पालकांबरोबर लहान मुलांनीही हजेरी लावली़ तरुणांबरोबर वयोवृद्ध नागरिकांनी या मैदानावर नमाज अदा करुन ईश्वराला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला़ पांढर्‍या वेशातील जनसमुदाय लक्षवेधी ठरला़ जवळपास २० हजार बांधवांनी नमाज पठणासाठी हजेरी लावली होती़
आलिंगण देत दिल्या शुभेच्छा़़़
नमाज पठणानंतर अनेकांनी प्रारंभी शहर काझींना रमजान ईदच्या शुभेच्छा देत गळा भेट घेतली़ त्यानंतर नागरिकांनी एकमेकाला आलिंगण देत ईदच्या शुभेच्छा दिल्या़ गर्दीतही मित्र, नातेवाईकांना भेटून शुभेच्छा देतानाचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले़
दानत्वाची परंपरा पाळली
कुराणामध्ये दानत्वाचे महत्त्व सांगितले गेले आहे़ नमाज पठणानंतर मुस्लीम बांधवांनी दानत्वाची परंपरा पाळली़ अनेक ठिकाणच्या प्रार्थनास्थळांसाठी जमेल तेवढी देणगी देऊन दानत्वाचे महत्त्व विषद केले़
मित्रांची गर्दी अन् क्षीरकुर्मा
नमाज पठणानंतर मित्रांना, नातेवाईकांना घरी बोलावून गोड पदार्थ अर्थात क्षीरकुर्मा दिला जाण्याची परंपरा आहे़ घरोघरी मित्रांची गर्दी, हास्याचे फवारे, विनोद असेच काही प्रसंग पाहायला मिळाले़ अनेक दिवसांतून भेटलेले मित्र ईदनिमित्त घरी भेटल्याचा आनंद चेहर्‍यावरुन ओसंडून वाहत होता़