ईडीच्या कार्यालयातील पाच जणांना कोरोनाची बाधा, ऑफीस सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 02:59 IST2020-06-07T02:58:25+5:302020-06-07T02:59:08+5:30

गुरूवारी येथील काही कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते

Five people in the ED's office were hit by a corona, the office sealed | ईडीच्या कार्यालयातील पाच जणांना कोरोनाची बाधा, ऑफीस सील

ईडीच्या कार्यालयातील पाच जणांना कोरोनाची बाधा, ऑफीस सील

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील खान मार्केटमध्ये असलेली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुख्यालयाची इमारत सील करण्यात आली आहे. तिथे काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच शनिवार आणि रविवार या दोन दिवसांसाठी सील करण्यात आली आहे. तिथे आता सॅनिटायझेशनचे काम सुरू आहे.

गुरूवारी येथील काही कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. लागण झालेल्यांमध्ये ईडीचे विशेष संचालक आणि विमान घोटाळ्याचा तपास करणारे अधिकारी यांचाही समावेश आहे. कायदा आणि इंटेलिजन्स या विभागातील काही कर्मचाºयांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले. खबरदारीसाठी १० कर्मचाºयांना क्वारंटाइन करण्यात आले आह

Web Title: Five people in the ED's office were hit by a corona, the office sealed