'आधी कृष्ण भक्तीला विरोध, मग धर्मपरिवर्तनासाठी दबाव'; रशियन मुलीचा मुस्लीम पतीला सोडून हिंदू मुलाशी साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 10:58 AM2022-11-30T10:58:51+5:302022-11-30T11:00:08+5:30

यापूर्वी तिने एका मुस्लीम मुलासोबत लग्न केले होते. पण तो तिच्यावर मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता, असा दावा तिने केला आहे.

First opposed to Krishna devotion, then pressure for conversion'; A Russian girl leaves her Muslim husband and gets engaged to a Hindu boy | 'आधी कृष्ण भक्तीला विरोध, मग धर्मपरिवर्तनासाठी दबाव'; रशियन मुलीचा मुस्लीम पतीला सोडून हिंदू मुलाशी साखरपुडा

'आधी कृष्ण भक्तीला विरोध, मग धर्मपरिवर्तनासाठी दबाव'; रशियन मुलीचा मुस्लीम पतीला सोडून हिंदू मुलाशी साखरपुडा

googlenewsNext

कृष्ण भक्तीत लीन झालेली एक रशियन मुलगी अथवा महिला आपला देश सोडून पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील मायापूर शहरात येऊन स्थायिक झाली आहे. येथे ती एका भारतीय मुलाच्या प्रेमात पडली आणि दोघांनी साखरपुडा केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी तिने एका मुस्लीम मुलासोबत लग्न केले होते. पण तो तिच्यावर मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता, असा दावा तिने केला आहे. यानंतर या मुलीने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

या रशियन मुलीचे नाव स्वेतलाना ओचिलोवा असे आहे. तिने सांगितले, की ती पेशाने एक ग्राफिक डिझायनर आहे. तिने एका मुस्लीम व्यक्तीबरोबर लग्न केले होते. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र नंतर, स्वेतलाना कृष्ण भक्तीकडे लीन होऊ लागली. स्वेतलाना 2012 मध्ये पहिल्यांदाच कृष्ण भक्तांसोबत भेटली होती. यामुळे तिचे आणि पतीचे भांडणही होऊ लागले होते.

पहिल्या पतीवर आरोप करताना स्वेतलाना म्हणाली, तो कृष्ण भक्तांचा द्वेष करत असे. त्याने मला भक्तांना भेटण्यापासून रोखले. त्यांनी मला अनेक वेळा मारहाणही केली आणि माझ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबावही टाकला.

पतीसोबतच्या भांडणांमुळे त्रस्त झालेल्या स्वेतलानाने पतीचे घर सोडले आणि ती आपल्या मुलासोबत तिच्या आई-वडिलांकडे राहण्यासाठी गेली. 2016 पासून स्वेतलानाने पूर्णपणे कृष्ण भक्तीच्या पथावर चालण्याचा निर्णय घेतला. ती पतीपासून 1 वर्ष विभक्त राहिली. तिने मंदिरांना भेटी देण्यास सुरुवात केली, याच दरम्यान ती पहिल्यांदा भारतातही आली.

स्वेतलाना म्हणाली, माझ्या मनातून पतीची भीती पूर्णपणे निघून गेली. मी आनंदी राहू लागले. 2017 मध्ये पहिल्यांदा मी माझ्या पतीशी शांततेत बोलले. त्याने मला, कृष्ण अथवा माझ्यात एकाची निवड कर, असे सांगितले. यावर मी कृष्णाची निवड केली. यानंतर आमचा तलाक झाला. यानंतर तो माझ्या आणि मुलाच्यामध्ये कधीच आला नाही.

नंतर, स्वेतलाना आपल्या मुलासोबत मायापूर शहरात येऊन राहू लागली. याथे तीची रोशन झा यांच्यासोबत ओळख झाली. तोही एक कृष्ण भक्तच होता. यानंतर, दोघांचे बाँडिंग चांगले डेव्हलप झाले. यानंतर दोघांनीही नुकतीच एंगेजमेन्ट केली.

साखरपुड्याची घोषणा करत, स्वेतलानाने एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. यात ती म्हणाली, तो खरोखरच आमची काळजी करतो. रोशन झा यांनी मला माझा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यासह स्वीकारले आहे. ते माझ्यावर प्रेम करतात. त्यांनी माझ्या मुलाचाही स्वीकार केला आहे. स्वेतलाना आणि रौशनने वृंदावनमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर साखरपुडा केला आहे. यावेळी दोघांचेही काही मित्रही उपस्थित होते.

स्वेतलाना सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. ती कृष्ण भक्तीत लीन असलेले आपले व्हिडिओज आणि फोटोज शेअर करत असते. इंस्टाग्रामवर स्वेतलानाचे 1 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.

 

Web Title: First opposed to Krishna devotion, then pressure for conversion'; A Russian girl leaves her Muslim husband and gets engaged to a Hindu boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.