शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदारावर गोळीबार, पत्नीसोबत नाईट वॉक करत असताना झाडल्या गोळ्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:37 IST

Firing on BJP MLA: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे भाजपा आमदार सौरभ सिंह सोनू यांच्यावर गोळीबार झाला आहे. आमदार सौरभ सिंह सोनू हे पत्नीसोबत नाईट वॉक करत असताना हा गोळीबार झाला.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे भाजपाआमदार सौरभ सिंह सोनू यांच्यावर गोळीबार झाला आहे. आमदार सौरभ सिंह सोनू हे पत्नीसोबत नाईट वॉक करत असताना त्यांनी घराजवळ दोन दुचाकीस्वार तरुणांना पाहिले.  हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. आमदार महोदयांनी त्यांना हटकले असता त्यांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच आमदारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असता हवेत गोळीबार करून फरार झाले. या प्रकरणी सौरभ सिंह सोनू यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हे संपूर्ण प्रकरण लखीमपूर खीरी येथील सदर कोतवाली ठाणे क्षेत्रामधील आहे. येथे बुधवारी रात्री झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. कस्ता येथील भाजपा आमदार सौरभ सिंह सोनू यांची दोन तरुणांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर या तरुणांनी हवेत गोळीबार केला. सुदैवाने कुणालाही गोळी लागली नाही. ही घटना घडली तेव्हा आमदार सौरभ सिंह सोनू यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्यासोबत नव्हते.  

आमदार सौरभ सिंह यांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, रोज रात्रीचं भोजन झाल्यानंतर मी घराबाहेर फिरतो. काल रात्रीसुद्धा फिरत होतो. त्यावेळी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मला घरापासून ५०-१०० मीटर अंतरावर दुचाकी घेऊन असलेले दोन तरुण दिसले. तसेच ते अर्वाच्च भाषेत बोलत होते. जेव्हा मी त्यांना हटकले तेव्हा ते माझ्याशी वाद घालू लागले. तसेच त्यांनी हवेत गोळीबार केला. जर त्यांनी थेट गोळीबार केला असता तर काही अघटित घडण्याची शक्यता होती.

सिंह पुढे म्हणाले की, रात्री फिरणं माझ्या नियमित जीवनशैलीचा भाग आहे. या युवकांना याची आधीपासून माहिती असण्याची शक्यता आहे. सुदैवाने कुणालाही गोळी लागली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून, त्यांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाMLAआमदार