पंजाबमध्ये प्लॉस्टिक कारखान्याला आग, तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 17:00 IST2017-11-20T16:53:58+5:302017-11-20T17:00:13+5:30
पंजाबमधील लुधियानामध्ये असलेल्या एका प्लॉस्टिक पिशव्या बनविणा-या कारखान्याला आग लागली असून या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. तर, अनेक जण कारखान्यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पंजाबमध्ये प्लॉस्टिक कारखान्याला आग, तिघांचा मृत्यू
लुधियाना : पंजाबमधील लुधियानामध्ये असलेल्या एका प्लॉस्टिक पिशव्या बनविणा-या कारखान्याला आग लागली असून या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. तर, अनेक जण कारखान्यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लुधियानातील मुस्ताक नगरमध्ये तीन मजली प्लॉस्टिक पिशव्या बनविणा-या कारखान्याला आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच, आगीमुळे कारखान्याचा काहीसा भाग कोसळला असून ढिगा-यासाठी काहीजण अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझविण्याचे आणि ढिगा-याखाली अडकलेल्यांची सुटका करण्याचे काम सुरु आहे.
#Punjab Team of National Disaster Response Force at the site of fire and building collapse in a plastic manufacturing factory in Industrial Area- A near Sufia Chowk in Ludhiana pic.twitter.com/4YJCvrrplS
— ANI (@ANI) November 20, 2017
आम्ही ढिगा-यातून एक मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र, त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही, असे लुधियानाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र सिंग यांनी सांगितले.