मध्यरात्री विमानात लागली आग, 150 प्रवाशांचा जीव वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 14:17 IST2018-08-02T14:15:18+5:302018-08-02T14:17:25+5:30
येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जजीरा एयरवेजच्या विमानात अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

मध्यरात्री विमानात लागली आग, 150 प्रवाशांचा जीव वाचला
हैदराबाद - येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जजीरा एयरवेजच्या विमानात अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जे9-608 कुवैत-हैदराबाद या विमानातील इंजिनमध्ये ही आग लागली होती. हैदराबाद विमानतळावर विमान उतरताच, हवाई यंत्रणा आणि तेथील कर्मचाऱ्यांनी विमानात लागलेली किरकोळ आग पाहिली. त्यानंतर, विमानातील पायलटला याबाबत सूचना देऊन तातडीने इंजिन बंद करण्यात आले.
जजीरा एअरवेजचे विमान गुरुवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यावेळी विमानातील उजव्या बाजुच्या इंजिनमध्ये किरकोळ आग लागल्याचे हवाई यंत्रणा आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच विमानातील प्रवाशांना तात्काळ खाली उतरविण्यात आले. हवाई यंत्रणेने तात्काळ या घटनेची दखल घेतल्यामुळे सुदैवाने सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईतील घाटकोपर येथे एक चार्टर्ड विमान दुर्घटना घडली होती. त्यामध्ये 2 वैमानिकांचा मृत्यू झाला होता.