fire broke at an Amazon store; Two killed in fire at scrap godown | Amazon च्या स्टोअरला भीषण आग; स्क्रॅप गोडाऊनला लागलेल्या आगीत दोन ठार

Amazon च्या स्टोअरला भीषण आग; स्क्रॅप गोडाऊनला लागलेल्या आगीत दोन ठार

दिल्लीतील Amazon च्या स्टोअरला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये एक महिला आणि अग्निशमन दलाच्या जवान जखमी झाले आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 


दिल्लीच्या रोहिनी भागात सेक्टर ६ मध्ये अॅमेझॉन कंपनीचे स्टोअर आहे. या स्टोअरद्वारे अॅमेझॉनवर विकल्या जाणार्या वस्तू विकल्या जातात. तर वस्तुंची मागणीही नोंदविता येते. या स्टोअरमध्ये साफसफाईचे काम सुरु असताना अचानक आग लागली. यामध्ये एक महिला आणि अग्निशमन दलाच्या जवान जखमी झाले. 
तर दुसऱ्या एका आगीच्या घटनेत दिल्लीतील कीर्तीनगरमध्ये एका स्क्रॅपच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: fire broke at an Amazon store; Two killed in fire at scrap godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.