चंदीगडमध्ये गर्ल्स होस्टेलला आग, तीन मुलींचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 20:33 IST2020-02-22T20:15:29+5:302020-02-22T20:33:26+5:30

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

Fire breaks out at PG in Chandigarh, 3 girls dead | चंदीगडमध्ये गर्ल्स होस्टेलला आग, तीन मुलींचा होरपळून मृत्यू

चंदीगडमध्ये गर्ल्स होस्टेलला आग, तीन मुलींचा होरपळून मृत्यू

चंदीगड : चंदीगड येथील सेक्टर 32डीमध्ये शनिवारी दुपारी एका इमारतीला आग लागली. या आगीत तीन मुलींचा होरपळून मृत्यू  झाला. तर एका मुलीने मजल्यावरून उडी मारून स्वत:चा जीव वाचविला. रिया, पाखी आणि मुस्कान अशी या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मुलींची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 32डीमध्ये एका इमारतीला आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विद्यार्थिनींचे वसतीगृह (पीजी) आहे. या पहिल्या मजल्यावर आग लागल्यानंतर काही मुली सुखरुप बाहेर पडल्या. मात्र, आगीत अडकलेल्या तीन मुलींचा होरपळून मृत्यू झाला. तर एका मुलीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून स्वत:चा वाचविला. 

तिला दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस सुद्धा दाखल झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर महत्त्वाची बैठक, शरद पवारही उपस्थित

शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला घर चालवण्याचा वेगळा 'मंत्र'

'त्या' तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; मी एकटी नाही, फक्त चेहरा आहे माझ्यामागे तर... 

संपूर्ण देशात एनआरसी लागू न करण्याचे मोदींनी आश्वासन दिले : उद्धव ठाकरे

Web Title: Fire breaks out at PG in Chandigarh, 3 girls dead

टॅग्स :fireआग