Fire breaks out on the 13th floor of a multi- storey building at Strand road in Kolkata, 9 dead | Kolkata Railway Building Fire: कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; रेल्वे कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा होरपळून मृत्यू

Kolkata Railway Building Fire: कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; रेल्वे कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा होरपळून मृत्यू

ठळक मुद्देआगीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोलकाता: कोलकाता येथील स्ट्रँड रोड (Strand Road) परिसरात असलेल्या एका बहुमजली इमारतीच्या 13 व्या मजल्यावर सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीत दोन रेल्वे कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला. या इमारतीमध्ये पूर्व रेल्वेचे (Eastern Railway) विभागीय कार्यालय आहे. मृतांमध्ये रेल्वे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.(Fire breaks out on the 13th floor of a multi- storey building at Strand road in Kolkata)

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आगीची घटना सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. पूर्व रेल्वेचे प्रवक्ता कमल देव यांनी सांगितले की, न्यू कोयलाघाट इमारतीत (New Koilaghat building) आग लागली. यामध्ये पूर्व रेल्वेचे आणि दक्षिण-पूर्व रेल्वेचे क्षेत्रिय कार्यालय आहे. तसेच, इमारतीच्या तळमजल्यावर कॅम्प्युटराइज्ड तिकीट बुकिंग केंद्र आहे. आग लागल्यामुळे तिकीट बुकिंग प्रकियेवर परिणाम झाला आहे.

आग लागल्याचे समजल्यानंतर सुरक्षा कर्मचारी तातडीने 13व्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी बहुतांश कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. साधारण साडेसहाच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान इमारतीमध्ये आले. ही आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी रेल्वे अधिकारी पार्था सारथी मंडल आणि एस सहनी या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आगीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, स्ट्रँड रोडवरील न्यू कोयलाघाट इमारतीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये चार अग्निशमन कर्मचारी, हरे स्ट्रीट पोलीस ठाण्यात तैनात असलेले सहायक उपनिरीक्षक आणि आरपीएफचा एक जवान असल्याचे अग्निशमन व आपत्कालीन सेवामंत्री सुजित बसू यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
आगीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत रेल्वे व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. आम्ही या सगळ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fire breaks out on the 13th floor of a multi- storey building at Strand road in Kolkata, 9 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.