FinCEN Files : Corruption of 2 lakhs crores from scams, scams, tax evasion; If the names are announced, there will be a political earthquake in India | FinCEN Files : घोटाळे, अफरातफर, करचोरीमधून लाखो कोटींचा भ्रष्टाचार; नावे जाहीर झाल्यास देशात होईल राजकीय भूकंप

FinCEN Files : घोटाळे, अफरातफर, करचोरीमधून लाखो कोटींचा भ्रष्टाचार; नावे जाहीर झाल्यास देशात होईल राजकीय भूकंप

ठळक मुद्देफिनसेनच्या कागदपत्रांमधून भारतातील सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा उलगडा करचोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेल्या कंपन्या आणि व्यक्तींच्या नावांचा समावेशही नावे जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता

नवी दिल्ली - घोटाळे, अफरातफर आणि करचोरीच्या माध्यमातून देशात झालेल्या तब्बल दोन लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. अमेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राइम्स इंफोर्समेंट नेटवर्क (FinCEN Files) कडे भारतातील घोटाळेबाज, भ्रष्ट नोकरशाहा आणि बँकांमध्ये अफरातफर करणाऱ्यांची एक अशी यादी आहे जी जाहीर झाल्यास भारताच्याराजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

फिनसेनच्या कागदपत्रांमध्ये ऑगस्टा वेस्टलँड, एअरसेल मॅक्सिस, २जी घोटाळा आणि रोल्स रॉयस लाचखोरी प्रकरणासह करचोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेल्या कंपन्या आणि व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट (आयसीआयजे) यांच्या मदतीने या नावांचा उलगडासुद्धा होऊ लागला आहे. फिनसेन फाइल्सने ज्या नावांची यादी तयार केली आहे, त्याची माहिती आता ८८ देशांमधील १०९ हून अधिक वृत्तसंस्थांना झाली आहे. त्यामुळे ही नावे जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता आहे.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार फिनसेनकडून मिळालेल्या दोन हजार गोपनीय कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पैशांची मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या देवाणघेवाण करणाऱ्या अनेक भारतीयांच्या नावांचा उलगडा झाला आहे. दरम्यान, या अफरातफरीमध्ये ज्यांच्या मदतीने हे घोटाळे झाले, त्या बँकांच्या नावांचाही समावेश आहे.

फिनसेनच्या कागदपत्रांमधून भारतातील सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा उलगडा झाला आहे. दरम्यान, भारतातील विविध तपास यंत्रणा चौकशी करत असलेल्या विविध घोटाळेबाज व्यक्तींच्या नावांचा या कागदपत्रांमधून शोघ घेण्याचा प्रयत्न केल्याचे या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेच्या फिनसेनच्या कागदपत्रांमध्ये ऑगस्टा वेस्टलँड, एअरसेल मॅक्सिस, २जी घोटाळा आणि रोल्स रॉयस लाचखोरी अशा मोठ्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. तसेच या यादीत अशा कंपन्या आणि व्यक्तींचा समावेश आहे ज्यांची चौकशी भारतातील सीबीआय, ईडी आणि डीआरआय अशा यंत्रणा करत आहेत.

फिनसेन फाइल्समध्ये ग्लोबल डायमंड कंपनीचा भारतात जन्मलेला एक सदस्य, हेल्थकेअर आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील एका मोठ्या कंपनी, आयपीएल टीमची एक स्पॉन्सर कंपनी. सध्या तुरुंगात असलेला दुर्मीळ वस्तूंचा तस्कर, आलिशान कारचा एक डिलर आणि भारतातील अंडरवर्ल्ड डॉनचा एक फायनान्सर यांच्यासह अन्य कंपन्या आणि व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे.

फिनसेन फाइल्सच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमध्ये १९९९ ते २०१७ या काळात भारतात घडलेल्या घटनांचा समावेश आहे.वृत्तात म्हटल्याप्रमाणे भारतातील बँकांच्या ३ हजार २०१ खात्यांमधून १.५३ अब्ज डॉलर सुमारे ११२ कोटी रुपयांची देवाणघेणाव झाली. यापैकी अनेकांचे पत्ते भारतातील आहेत. तर काही परदेशी पत्त्यांचाही उल्लेख आहे. भारतातील ४४ बँकांचा वापर अवैधरीत्या देवाणघेवाण करण्यासाठी झाला आहे. त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

English summary :
Corruption of 2 lakhs crores from scams, scams, tax evasion; If the names are announced, there will be a political earthquake in India.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: FinCEN Files : Corruption of 2 lakhs crores from scams, scams, tax evasion; If the names are announced, there will be a political earthquake in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.