साक्षी महाराजांना अखेर नोटीस

By Admin | Updated: January 13, 2015 07:52 IST2015-01-13T07:52:37+5:302015-01-13T07:52:37+5:30

साक्षी महाराजांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वादग्रस्त विधानांबद्दल भाजपने त्यांना सोमवारी कारणेदाखवा नोटीस दिली.

Finally notice to Sakshi Maharaj | साक्षी महाराजांना अखेर नोटीस

साक्षी महाराजांना अखेर नोटीस

>नवी दिल्ली: साक्षी महाराजांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वादग्रस्त विधानांबद्दल भाजपने त्यांना सोमवारी कारणेदाखवा नोटीस दिली. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशावरून ही नोटीस देण्यात आली असून तुमच्या विरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये याचे उत्तर द्या, असे तीत म्हटले आहे. पक्षाच्या धोरणाविरुद्ध जाणारी विधाने का केली, असे या नोटीशीत विचारण्यात आले आहे. साक्षी महाराज हे उन्नावचे खासदार आहेत. या नोटीशीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्यास ते उपलब्ध झाले नाहीत. साक्षी महाराजांनी काही िवसांपूर्वी हिंदू महिलांनी चार अपत्यांना जन्म द्यावा, असे आवाहन केले होते. 

Web Title: Finally notice to Sakshi Maharaj