शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अखेर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण आलं समोर? CFSLच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

By बाळकृष्ण परब | Published: September 24, 2020 10:55 AM

गेल्या सव्वातीन महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुरू असलेला तपासाचा तिढा आता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसुशांत सिंह राजपूतची  हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीतसुशांत सिंह राजपूतचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे आले समोर सीएफएसएलने हा अहवाल सीबीआयला केला सुपूर्द, मात्र या अहवालाला सीबीआयकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजयूत याच्या मृत्युप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. मात्र गेल्या सव्वातीन महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुरू असलेला तपासाचा तिढा आता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबमधील CFSL) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतची  हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. सीएफएसएलने सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे येथील राहत्या घरी क्राइम सीनचे रिक्रिएशन केले होते. त्यामध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे समोर आले. दरम्यान सीएफएसएलने आपला हा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला आहे. मात्र या अहवालाला अधिकृत दुजोरा सीबीआयकडून लवकरच देण्यात येण्याची शक्यता आहे.सीएफएसएलमधील सूत्रांच्या हवाल्याने न्यूज १८ हिंदीने हे वृत्त प्रसारित केले आहे. सीएफएसएलच्या अहवालामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे कारण पार्शियल हँगिंग असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पाय फाशीच्या दरम्यान पूर्णपणे हवेत नव्हते. तर त्याचा पाय जमिनीला लागत होता किंवा बेड किंवा स्टूलसारख्या कुठल्याही वस्तूला लागलेले होता. क्राइम सीनचे रिक्रिएशन आणि पंख्याला लटकलेल्या कपड्याच्या क्षमतेची चाचणी केल्यानंतर सीएफएसएलने हा अहवाल तयार केला आहे.सूत्रांनी सांगितले की, सीएफएसएलच्या रिपोर्टमध्ये हे दिसून आले आहे की, सुशांतने आपल्या दोन्ही हातांनी फास लावून घेतला असावा. रिपोर्टनुसार सुशांतने आपल्या उजव्या हाताचा वापर स्वत:ला लटकवून घेण्यासाठी केला असावा. तसेच त्याच्या गळ्यावर पडलेल्या लिगेचर मार्कच्या गाठीच्या स्थितीचाही अ‍ॅनॅलिसिस रिपोर्टमध्ये उल्लेख आहे.सरळ हाताचा वापर करणारी व्यक्तीच या प्रकारे फाशी लावून घेऊ शकते. सुशांतच्या खोलीमधून जप्त करण्यात आलेल्या कपड्याचा वापर फाशी लावून घेण्यासाठी करण्यात आल्याचेही रिपोर्टमधून उघड झाले आहे.बॉलिवूडमधील उगवत्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सुशांत सिंह राजपूतने जून महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान सुशांतच्या मृत्यूबाबत संशय घेण्यात आला होता. तसेच सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली, असावी अशी शंकाही व्यक्त केली जात होती. त्याबरोबरच त्याच्या मृत्यूवरून राजकारणही पेटले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्याश्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे  

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCrime Newsगुन्हेगारीbollywoodबॉलिवूडMumbaiमुंबई