शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मराठा आरक्षण : मराठ्यांसाठीच्या रिक्त वैद्यकीय पदव्युत्तर जागा खुल्या वर्गातून भरा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 03:28 IST

Maratha Reservation : रक्षणाच्या अपिलांवर जानेवारीत सुनावणी

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाच्या काळात रिकाम्या ठेवलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमधील जागा राज्य सरकारने स्वत:च काढलेल्या ‘जीआर’नुसार सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांमधून भराव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.मराठा आरक्षण वैध ठरविणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध डॉ.जयश्री पाटील यांच्यासह अन्य मूळ याचिकाकर्त्यांनी केलेली अपिले सर्वोच्च न्यायालयात जुलैपासून प्रलंबित आहेत. १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निकालास स्थगिती दिली नव्हती. मात्र, त्यावर दोन आठवड्यांनी विचार करू, असे नमूद केले होते. पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, असेही स्पष्ट केले होते, परंतु न्या.रंजन गोगोई निवृत्त होईपर्यंत काहीच झाले नव्हते.ही अपिले सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई व न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे आज आली, तेव्हा डॉ. गुणरत्न सदावर्ते व डॉ. संजय हेगडे यांच्या वकिलांनी मराठा आरक्षणासाठी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा रिकाम्या ठेवल्या आहेत, याकडे लक्ष वेधले, तेव्हा खंडपीठाने या जागा सर्वसाधारण प्रवर्गामधून भरण्याचा निर्देश दिला. अपिले अंतिम सुनावणीसाठी तयार आहेत का, यावर चर्चा झाली, तेव्हा मराठा आरक्षणाची शिफारस करणाºया मागासवर्गीय आयोगाच्या मराठी अहवालाचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध नसल्याचा मुद्दा राज्य सरकारतर्फे मुकुल रोहटगी व विजय थोरात यांनी मांडला. त्यावर हे भाषांतर राज्य सरकारनेच द्यावे, असे खंडपीठाने सांगितले.घटनापीठ का हवे?हा विषय घटनापीठाकडे सोपवावा, असेही राज्य सरकारने सुचविले. त्याची गरज नाही, असे अपिलकर्त्यांचे म्हणणे होते.घटनापीठ का हवे, हे आम्हाला पटवून द्या. त्याचीची लगेच स्थापना करू, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी सांगितले या अपिलांवर २२ जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचे ठरविले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaratha Reservationमराठा आरक्षण