लग्नाच्या आधी हल्लेखोरांनी कापलं गुप्तांग, जोडीदाराचा लग्न करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 12:29 IST2018-02-05T12:27:06+5:302018-02-05T12:29:41+5:30

हल्लेखोरांनी एका तरुणावर हल्ला करत त्याचं गुप्तांग कापून नेलं होतं. पीडित तरुणाचं मंगळवारी लग्न होणार होतं. या घटनेनंतर तरुणीने मात्र लग्नास नकार दिला आहे.

fiancee refuses to marry after criminals cut the young man penis | लग्नाच्या आधी हल्लेखोरांनी कापलं गुप्तांग, जोडीदाराचा लग्न करण्यास नकार

लग्नाच्या आधी हल्लेखोरांनी कापलं गुप्तांग, जोडीदाराचा लग्न करण्यास नकार

भोपाळ - मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपुर्वी हल्लेखोरांनी एका तरुणावर हल्ला करत त्याचं गुप्तांग कापून नेलं होतं. पीडित तरुणाचं मंगळवारी लग्न होणार होतं. या घटनेनंतर तरुणीने मात्र लग्नास नकार दिला आहे. यामुळे तरुणाला दुहेरी मानसिक धक्का बसला आहे. लग्नाला पाच दिवस उरलेले असताना अज्ञात आरोपींनी 25 वर्षीय तरुणावर हल्ला करुन त्याचे गुप्तांग कापून नेले होते. गुरुवारी सकाळी हा तरुण घराबाहेर पडताच दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला करुन त्याचे गुप्तांग कापले. आरोपींनी तिथून जाताना ते गुप्तांगही स्वत:सोबत घेऊन गेले. त्यामुळे शस्त्रक्रियेनेही आता काही होऊ शकली नाही. 6 फेब्रुवारीला त्याचे लग्न होणार होते. 

पोलिसांना अद्याप या आरोपींची ओळख पटवता आलेली नाही तसचे या हल्ल्यामागचा उद्देशही कळलेला नाही. आमच्या हाती काहीही धागेदोरे नाहीत. पीडित तरुण काही बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीय असे पोलीस निरीक्षक अमित शर्मा यांनी सांगितले. शस्त्रक्रियेद्वारे तुटलेला अवयव शरीराशी जोडता येतो. त्यासाठी  घटनास्थळी शोध घेऊनही अवयव सापडला नाही असे पोलिसांनी सांगितले. 

पीडित तरुण नदी किनारी फेरफटका मारण्यासाठी गेलेला असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला व गुप्तांग कापले असे गावक-यांनी पोलिसांना सांगितले. पीडित तरुणाच्या घरच्यांनीही कोणावर संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळे आम्ही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही पीडित तरुणाच्या जबाबाची वाट पाहत आहोत असे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल केला आहे. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे. पीडित तरुणाचे नातेवाईक घटनेनंतर धक्क्याखाली असून त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. 
 

Web Title: fiancee refuses to marry after criminals cut the young man penis

टॅग्स :Crimeगुन्हा