शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

By admin | Published: July 31, 2015 10:25 PM

फोटो ओळी ....मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्कारमूर्ती व उपस्थित मान्यवर.

फोटो ओळी ....मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्कारमूर्ती व उपस्थित मान्यवर.
शहीद सफाई दिन : नावासहीत बीटमध्ये फोटो लावणार
नागपूर : सफाई कामगार दिनानिमित्त आज शुक्रवारी महापालिकेच्या सिव्हिल लाईन येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते ५० गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहर, उपसभापती मीना तिडके, झोन सभापती वर्षा ठाकरे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर आदी उपस्थित होते.
शहीद सफाई दिनानिमित्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते. गुणवंत कामगारांच्या कार्याची दखल म्हणून प्रत्येक झोनमधील तीन सफाई कर्मचारी व दोन ऐवजदार पाच अशा ५० कर्मचाऱ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहराची स्वच्छता करून सफाई कामगार जनतेची सेवा करीत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला. गुणवंत कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे एक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाप्रमाणे सफाई कर्मचारी स्वच्छतेचे काम करतात त्यांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन हर्डीकर यांनी केले. डॉ. मिलिंद गणवीर यांनी या वर्षापासून स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रत्येक झोनमधून एक महिला व एक पुरुष अशा दोन ऐवजदारांची गुणवंत कामगार म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती दिली. प्रारंभी महापौर व मान्यवरांनी महर्षी सुदर्शन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन केले. संचालन महेंद्र मनपीया यांनी तर आभार राजेश हाथीबेड यांनी मानले. कार्यक्र माला सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)