भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 01:08 IST2018-10-20T21:18:45+5:302018-10-21T01:08:22+5:30
- भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून एक तलाव निर्माण झाले आहे. या जलाशयात मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.

भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात
गुवाहाटी - भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून एक तलाव निर्माण झाले आहे. या जलाशयात मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या अनेक जिल्ह्यात एनडीआरएफच्या 32 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
China has informed India about a rise in water levels in the Brahmaputra, prompting authorities to take precautionary arrangements in Arunachal https://t.co/OKJqeIWlQn
— The Indian Express (@IndianExpress) October 20, 2018
अचानक येऊ शकणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या अनेक जिल्ह्यात 32 टीम तैनात करण्यात आल्या आहेत, असे एनडीआरएफने सांगितले आहे. दरम्यान, भूस्खलनामुळे चीनमध्ये अडकलेल्या सुमारे सहा हजार जणांना सुखरूपरीत्या वाचवण्यात आल्याचे चीनमधील एमर्जंन्सी सर्व्हिसेसने सांगितले आहे. तसेच या पुराबाबत चीनकडून भारताला माहिती देण्यात येत आहे.