शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भारताच्या हल्ल्याची पाकला भीती; सीमेजवळील नागरिकांना केले सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 05:33 IST

लष्कराने सुरू केली तयारी : रुग्णालयांत जवानांसाठी २५ टक्के खाटा ठेवण्याचे आदेश

श्रीनगर : पुलवामाच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या भारताकडून हल्ले होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये धावपळ सुरू झाली आहे. पाक सरकारने खासगी व सरकारी २५ टक्के खाटा जवानांसाठी राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नियंत्रण रेषेजवळील नीलम, झेलम, रावळकोट, हवेली, भीमबेर या भागातील लोकांना हल्ल्यांपासून सतर्क राहाण्याचा इशारा दिला असून, रात्री शक्यतो दिवे लावू नका, अशाही सूचना केल्या आहेत.

पाकिस्तानी लष्कराच्या बलुचिस्तानमधील एका छावणीतला दस्तावेज तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाला सरकारने पाठविलेले पत्रातून ही माहिती उघड झाली. भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी केली असल्याचे या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. भारताशी होणारे संभाव्य युद्ध लक्षात घेऊन सर्व वैद्यकीय सुविधांनिशी सुसज्ज राहावे, असे पत्र क्वेट्टा येथील लष्करी तळाने सिंध व पंजाब प्रांतातील लष्करी व अन्य रुग्णालयांना पाठविले आहे. बलुचिस्तानमध्ये पाकसरकारविरोधी भावना प्रबळ आहे. त्यामुळे तिथे आदेशांचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून पाकिस्तान सरकार अधिकच लक्ष देत आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर काय कारवाई करायची याचे संपूर्ण अधिकार लष्कराला दिले आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. त्यावर भारताने हल्ला केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल्, असा इशारा पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला होता. भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्याची शक्यता लक्षात घेऊन सीमेजवळील सर्व दहशतवादी तळ पाकिस्तानने आपल्या लष्करी छावण्यांजवळ हलविले आहेत. त्यामुळे भारताने हल्ला चढविल्यास त्यांची थेट पाकिस्तानी सैन्याशी गाठ पडेल.काश्मिरी अतिरेक्यांना उत्तर प्रदेशातून अटकलखनऊ : जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे अटक करण्यात आली. त्यापैकी एक कुलगामचा शहानवाज अहमद तेली व दुसरा पुलवामातील अकीब अहमद मलिक आहे. जैश-ए-मोहम्मदमध्ये दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम हे दोघे करत. त्यांचा १४ फेब्रुवारीच्या पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभाग आहे का असे विचारता पोलिसांनी सांगितले की, पुलवामा हल्ल्याआधी ते इथे का आले, चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिक काही माहिती सांगता येईल.पाकिस्तानमध्ये६९ संघटनांवर बंदीइस्लामाबाद : मुंबईवर २००८ साली झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा, फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन यासह ६९ दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानने आजवर बंदी घातली आहे. भारताने बंदी घातलेल्या निम्म्याहून अधिक संघटनांना पाकिस्तानातील दहशतवादी गटांकडून मदत मिळत होती.काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्माश्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सोपोरच्या वारपोरा भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी तिथे शोधमोहिम हाती घेतली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांना सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSoldierसैनिकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान